आजकाल घरा- घरात स्मार्ट टीव्ही सामान्य झाले आहे. अनेक जबरदस्त फीचर्स, पिक्चर क्वालिटी, आणि मस्त आवाज यामुळे अनेक जण आजकाल स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याला प्राध्यान देतात. पण, टेलिव्हिजनला मोठा इतिहास आहे. ज्यात काळ्यापासून पांढर्‍या रंगात आणि नंतर स्मार्ट टेलिव्हिजनने घरा- घरात आपले स्थान निर्माण केले. जर तुम्हीही तुमच्या घरातील टेलिव्हिजन लवकरच स्मार्ट टीव्हीवर बदलण्याचा विचार करत असाल. तर आम्ही तुम्हाला अशीच काही माहिती देणार आहोत.सामान्य टीव्हीपेक्षा स्मार्ट टीव्हीच्या किमती जरा जास्तच असतात. अशात स्मार्ट टीव्ही खरेदी करतांना योग्य काळजी न घेतल्यास तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. पण, या काही सोप्प्या गोष्टी लक्षात ठेवल्यास तुम्हाला टीव्ही खरेदी करणे अतिशय सोप्पी जाईल.डिटेल्स पाहा आणि ठरवा तुम्ही कोणता Smart tv घरी आणणार ते.

कनेक्टिव्हिटी

कनेक्टिव्हिटी

कनेक्टिव्हीटी पर्याय: स्मार्ट टीव्ही खरेदी करतांना आणखी एक महत्वाची बाब म्हणजे कनेक्टिव्हीटी पर्याय . आज काल कनेक्टिव्हिटीसाठी देखील स्मार्टफोनमध्ये अनेक पर्याय देण्यात येतात. स्मार्ट टीव्हीमध्ये हार्ड डिस्क सपोर्ट, MP4, AVI, MKV सारखे सामान्य व्हिडिओ फॉरमॅट्स सुरळीतपणे प्ले झाले पाहिजेत. यासह, एचडी कन्टेन्ट ऑनलाइन पाहताना प्रदर्शनाच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ नये. यासह, टीव्ही खरेदी करण्यापूर्वी USB प्लेबॅक परफॉर्मन्स एकदा तपासणे देखील आवश्यक आहे.

टीव्ही अॅप्स

टीव्ही अॅप्स

तुम्ही OS सह काय करू शकता : Android ऑपरेटिंग सिस्टमसह टीव्हीवर अनेक अॅप्स स्वतंत्रपणे स्थापित केले जाऊ शकतात. यामध्ये इंटरनेटसाठी वाय-फाय, इथरनेट सारखी वैशिष्ट्ये आहेत. याशिवाय, मोशन सेन्सर देखील आहेत जे गेम खेळण्यासाठी उपयुक्त आहेत. काही टीव्हीमध्ये USB पोर्ट असतो ज्यामध्ये कीबोर्ड कनेक्ट केला जाऊ शकतो. हे वेबकॅम आणि माइक कनेक्ट करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. ब्लूटूथच्या साहाय्याने वायरलेस उपकरणेही त्याच्याशी जोडली जाऊ शकतात.

आवाज

आवाज

आवाजाशिवाय मजा नाही : स्मार्ट टीव्हीमध्ये, स्क्रीन नंतर येते, चित्र गुणवत्ता. जर तुम्ही मोठा स्क्रीन आणि HD किंवा 4K स्क्रीन असलेला स्मार्ट टीव्ही खरेदी केला असेल. पण त्याचा आवाज दर्जा चांगला नाही. तर, तुमच्या स्मार्ट टीव्हीची मजा अर्धवटच राहणार आहे. त्यामुळे जेव्हाही तुम्ही स्मार्ट टीव्ही खरेदी करता तेव्हा त्यात ५ ते १० वॅटचे स्पीकर असावेत. हॉलमध्ये किंवा कोणत्याही मोठ्या खोलीत स्मार्ट टीव्ही लावायचा असेल, तर पोर्टेबल स्पीकरही वापरता येतील.

डिस्प्ले

प्रदर्शन

डिस्प्लेशी तडजोड करू नका : जेव्हा तुम्ही स्मार्ट टीव्ही खरेदी करण्यासाठी जाता. तेव्हा काही गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे सर्वप्रथम, तुम्हाला फक्त HD किंवा 4K स्मार्ट टीव्ही घ्यावा लागेल याची खात्री करा. कारण HD आणि 4K TV मध्ये व्हिडिओ क्वालिटी जास्त चांगली असते. यासोबतच स्मार्ट टीव्ही घेताना पिक्चर क्वालिटी तपासा. यासाठी तुम्ही स्मार्ट टीव्हीवर कार्टून पाहू शकता. कारण बहुतेक कार्टून कॅरेक्टर हे मल्टी कलर आहेत आणि यावरून तुम्हाला स्मार्ट टीव्हीच्या पिक्चर क्वालिटीची कल्पना येईल.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here