नवी दिल्लीः कंपनीने गेल्यावर्षी भारतीय बाजारात लाँच केलेला स्मार्टफोनच्या किंमतीत आता ४ हजारांची कपात करण्यात आली आहे. ८ जीबी रॅमच्या मॉडेलच्या किंमतीत ही कपात करण्यात आली आहे. दरम्यान, कंपनीने या फोनच्या कमी किंमतीसंबंधीची कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. परंतु, कमी किंमतीत हा फोन कंपनीच्या वेबसाइटवर दिसत आहे.

विवोने याआधी अन्य तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे. याआधी या फोनची किंमत २१ हजार ९९० रुपये होती. परंतु, या कपातीनंतर या फोनची किंमत १७ हजार ९९० रुपये झाली आहे. ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्मार्टफोनची किंमत १५ हजार ९९० रुपये, ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १६ हजार ९९० रुपये तर ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १४ हजार ९९० रुपये आहे. विवोच्या झेडवनएक्स या स्मार्टफोनमध्ये २२.५ वॅट फ्लॅश चार्ज देण्यात आला आहे. तसेच ४५०० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन अँड्रॉयड ९.० ओएस वर आधारित आहे. तसेच क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७१२ एआई प्रोसेसरवर काम करतो. या फोनमध्ये ६.३८ इंचाचा फुल एचडी सुपर अमोलेड डिस्प्ले दिला आहे. याचा स्क्रीन रिझॉल्यूशन २३४०x१०८० पिक्सल आहे.

फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला आहे. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. तर या फोनमध्ये सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. याच्या मदतीने व्हिडिओ कॉलिंगग आणि सेल्फीचा आनंद घेता येवू शकतो. सुरक्षेसाठी यात फ्लॅश इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here