सोशल मीडिया युजर्स आणि व्हॉट्सअॅप युजर्स एक पॉर्न व्हिडिओ आणि या व्हिडिओचा घेतलेला एक स्क्रीनशॉट शेअर करीत आहेत. शेअर करताना दावा करण्यात येत आहे की, हा व्हिडिओ शाहीन बागमधील आहे. नागरिकत्व संशोधन कायदा () विरोधात शाहीन बागेत आंदोलन सुरू होते. देशभर चर्चेचा मुद्दा बनला होता.

उदाहरणासाठी पाहा

या व्हिडियोच्या स्क्रीनशॉटसह कॅप्शनमध्ये लिहिलेय, जसे जसे दिवस जात आहे. शाहीन बागमधील सत्य समोर येत आहे.

व्हिडिओ अश्लिल असल्याने या व्हिडिओची लिंक या ठिकाणी टाइम्स फॅक्ट चेक देऊ शकत नाही.

हा व्हिडिओ कमीत कमी दोन वर्षापूर्वीचा आहे. यावरून हे स्पष्ट होते की, हा व्हिडिओ शाहीन बागमधील नाही. शाहीन बागमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाशी या व्हिडिओचा काहीही संबंध नाही.

कशी केली पडताळणी?

गुगल क्रोम एक्सटेन्शन InVID चा वापर केल्यानंतर आम्हाला या व्हिडिओची फ्रेम्स वेगवेगळे केले. त्यानंतर वेगवेगळ्या सर्च इंजिनवर याला रिव्हर्स सर्च केले.

Yandex वर रिवर्स इमेज सर्च केल्यानंतर आम्हाला ३० मे २०१८ रोजी करण्यात आलेल्या एका ट्विटची लिंक मिळाली. या ट्विटमध्ये दोन फोटो होते. ज्यात एका व्हिडिओचा स्क्रीनशॉट आहे. जो आता शाहीन बागचा व्हिडिओ म्हणून शेअर केला जात आहे. यावरून हे स्पष्ट होते की, व्हिडिओ इंटरनेटवर २०१८ पासून शेअर केला जात आहे.

यानंतर आम्ही या ट्विटला शेअर केलेल्या स्क्रीनशॉटला रिवर्स सर्च केल्यानंतर आम्हाला एक पॉर्न वेबसाइटची लिंक मिळाली. ज्या ठिकाणी हाच व्हिडिओ होता. जो आता सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. पॉर्न वेबसाइटवर या व्हिडिओमध्ये म्हटले की, हे कपल उज्बेकिस्तानचे आहे. परंतु, आम्ही हा दावा करू शकत नाही.

वेबसाइटच्या माहितीनुसार, व्हिडिओ २ वर्षापूर्वी पब्लिश झाला होता. परंतु, या व्हिडिओच्या तारीखची उल्लेख नाही.

निष्कर्ष

सोशल मीडिया युजर्संनी एक पॉर्न व्हिडिओ, व्हिडिओचा स्क्रीनशॉट दिल्लीच्या शाहीन बागचा असल्याचे सांगत शेअर केला आहे. हा व्हिडिओ २०१८ मधील आहे. त्यामुळे या व्हिडिओतून जो दावा करण्यात येत आहे, तो सपशेल खोटा आहे, असे मटा फॅक्ट चेकच्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here