घराला आकर्षक बनविण्यासाठी आपण सर्वचजण प्रयत्न करत असतो. घर सुंदर व आकर्षक दिसण्यासाठी सर्वात महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक असते ते म्हणजे लायटिंग. भारतात स्मार्ट एलईडी लायटिंगची एक मोठी रेंज उपलब्ध आहे. मात्र, घराला अधिक आकर्षक व एम्बिएंस अधिक चांगला बनविण्यासाठी बाजारात अशा स्मार्ट एलईडी लाइट्स देखील आहेत, ज्या ब्लूटूथ स्पीकरसह येतात. या ब्लूटूथ स्पीकर लाइटिंगमुळे तुम्ही गाणी ऐकण्याचा देखील अनुभव घेऊ शकता. सोबतच, यांना रिमोटने कंट्रोल करणे देखील शक्य आहे. तुम्ही देखील घरातील नियमित बल्बला बदलून त्याजागी स्मार्ट ब्लूटूथ लायटिंग लावण्याचा विचार करत असाल तर बाजारात अनेक चांगले पर्याय उपलब्ध आहे. विशेष म्हणजे या स्मार्ट एलईडी लायटिंगची किंमत फक्त ३०० रुपये आहे. फ्लिपकार्टवर स्वस्तात उपलब्ध असलेल्या अशाच काही स्मार्ट LED म्यूझिक लाइट्सबद्दल जाणून घेऊया.

टॉग एलईडी संगीत बल्ब hx-015 स्मार्ट बल्ब

tog-led-music-bulb-hx-015-smart-bulb

Tog LED music bulb hx-015 Smart Bulb हा ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह येतो. या शानदार स्मार्ट एलईडी लाइटला तुम्ही स्मार्टफोनद्वारे ब्लूटूथने कनेक्ट करून कंट्रोल करू शकता. या स्मार्ट बल्बला तुम्ही स्मार्टफोन अथवा टॅबलेट/ब्लूटूथ एलईडी लँपच्या माध्यमातून नियंत्रित करू शकता. यामध्ये एकाच वेळी म्यूझिक आणि लायटिंगचा अनुभव मिळेल. याचा प्रकाश ५- वॉट हॅलोजन बल्ब समान आहे. हा एक एलईडी म्यूझिक बल्ब असून, प्लास्टिकद्वारे बनला आहे. याची किंमत फक्त २९७ रुपये आहे.

AOUclub म्युझिक लाइट बल्ब स्मार्ट म्युझिक लाइट

aouclub-संगीत-लाइट-बल्ब-स्मार्ट-म्युझिक-लाइट

AOUclub music light bulb Smart music light देखील तुमच्या घराला आकर्षक बनविण्यास मदत करेल. या स्मार्ट एलईडी बल्बची किंमत फक्त २९५ रुपये असून, तुम्ही प्रमुख ई-कॉमर्स साइट्सवरून बल्बला खरेदी करू शकता. यामध्ये ग्राहकांना ब्लिंकिंग डिस्को लाइट्स पाहायला मिळेल व यामुळे गाणी ऐकण्याचा आनंद दुप्पट होतो. AOUclub music light bulb हा १२ वॉटचा स्मार्ट एलईडी बल्ब असून, याद्वारे चांगला प्रकाश मिळतो.

ब्लूटूथसह GIVON स्मार्ट एलईडी म्युझिक लाइट बल्ब

गिव्हॉन-स्मार्ट-लेड-संगीत-लाइट-बल्ब-ब्लूटूथसह

GIVON Smart LED Music Light Bulb हा ब्लूटूथ स्पीकरसह येतो. या स्मार्ट एलईडी म्यूझिक लाइट बल्बचा वापर तुम्ही बेडरुम, लिव्हिंग रुम, पार्टी डेकोरेशनसाठी करू शकता. तसेच, या स्मार्ट एलईडी बल्बला रिमोटने कंट्रोल करू शकता. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये ब्लूटूथ ३.० दिले आहे. तुम्ही लायटिंगसह म्यूझिकला सिंक करू शकता. किंमतीबद्दल सांगायचे तर GIVON Smart LED Music Light Bulb ला तुम्ही फक्त २९९ रुपयात खरेदी करू शकता.

ECOELECTRA TM संगीत बल्ब स्मार्ट बल्ब

ecoelectra-tm-music-bulb-smart-bulb

ECOELECTRA TM Music bulb Smart Bulb ला देखील ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवरून स्वस्तात खरेदी करू शकता. या स्मार्ट बल्बची किंमत फक्त २९९ रुपये आहे. यात एक ब्लूटूथ स्पीकर देखील मिळतो. याचा वापर तुम्ही गाणी ऐकण्यासाठी करू शकता. तुम्ही या बल्बचा वापर करून घराला मिनिटात पार्टी प्लेसमध्ये बदलू शकता. यात कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ ४.० दिले असून, बल्बला स्मार्टफोन आणि टॅबलेटच्या माध्यमातून देखील कंट्रोल करू शकता.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here