Redmi Note 10

रियलमीच्या ४ जीबी + ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १३,९९९ रुपये आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ६७८ चिपसेट, ६.४३ इंच सुपर एमोलेड डिस्प्ले, ४८ मेगापिक्सल कॅमेरा आणि ५००० एमएएचची बॅटरी दिली आहे.
Realme 8i
Realme 8i च्या ४ जीबी व्हेरिएंटची किंमत १३,९९९ रुपयांपासून सुरू होते. यामध्ये मीडियाटेक हीलियो जी९६ चिपसेट, ५० मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि ५००० एमएएचची बॅटरी दिली आहे.
Moto G40

मोटोच्या या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ७३२जी प्रोसेसर, १२० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह ६.८ इंच आयपीएस एलसीडी डिस्प्ले, ६४ मेगापिक्सल कॅमेरा आणि ६००० एमएएचची बॅटरी दिली आहे. फोनची सुरुवाती किंमत १३,९९९ रुपये आहे.
रेडमी 10 प्राइम
या फोनची सुरुवाती किंमत १२,४९९ रुपये असून, यात ५० मेगापिक्सल क्वाड कॅमेरा सेटअप, मीडियाटेक हीलियो जी८८ चिपसेट, ६००० एमएएच बॅटरी आणि ६.५ इंच फुल एचडी+ डिस्प्ले मिळतो.
Moto G30

Moto G30 या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन ६६२ ४जी प्रोसेसर, ६.५ इंच एचडी+ आयपीएस एलसीडी, ५००० एमएएची दमदार बॅटरी आणि ६४ मेगापिक्सल क्वाड कॅमेरा सेटअप मिळतो. या फोनची सुरुवाती किंमत १०,९९९ रुपये आहे.
Samsung Galaxy M12
सॅमसंगच्या या पोनची सुरुवाती किंमत १०,९९९ रुपये असून, यात ६००० एमएएचची बॅटरी, ४८ मेगापिक्सल क्वाड कॅमेरा सेटअप, ६.४ इंच एचडी+ टीएफटी डिस्प्ले आणि ८nm Samsung Exynos ८५० SoC मिळतो.
Infinix Hot 11S

Infinix Hot 11S स्मार्टफोनमध्ये ५० मेगापिक्सल ड्यूल कॅमेरा सेटअप, ५००० एमएएच बॅटरी, ६.७८ इंच आयपीएस एलसीडी डिस्प्ले, ९० हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि मीडियाटेक हीलियो जी८८ चिपसेट मिळतो. फोनची किंमत १०,९९९ रुपये आहे.
सॅमसंग गॅलेक्सी F22
सॅमसंगच्या या फोनची किंमत १२,९९९ रुपये असून, यामध्ये ४८ मेगापिक्सल क्वाड कॅमेरा सेटअप, ६००० एमएएचची बॅटरी, ६.४ इंच एचडी+ एमोलेड डिस्प्ले आणि मीडियाटेक हीलियो जी८० चिपसेटचा सपोर्ट मिळतो.
Poco M3 Pro 5G

Poco M3 Pro 5G ची किंमत १४,४९९ रुपये असून, यात मीडियाटेक डायमेंसिटी ७०० चिपसेट, ५००० एमएएचची बॅटरी, ६.५ इंच FHD+ IPS LCD डिस्प्ले आणि ४८ मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे.
Realme Narzo 50A
Realme Narzo 50A स्मार्टफोनची सुरुवाती किंमत ११,४९९ रुपये असून, या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी८५ चिपसेट, ५० मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, ६००० एमएएचची बॅटरी आणि ६.५ इंच एचडी+ एलसीडी डिस्प्ले मिळतो.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times