या लॉकला कोणत्याही प्रकारच्या चावीची गरज नाही. तसेच कोणताही पासवर्डही लागणार नाही. त्यामुळे चावी विसरण्याचा तसेच पासवर्ड विसरण्याचा धोका नाही. तसेच हा लॉक केवळ एकाच युजरच्या फिंगरप्रिंटने उघडू शकतो. यात ४० लोकांच्या फिंगरप्रिंटचा डेटा जोडला जावू शकतो. म्हणजेच कुटुंबातील सदस्यांचा डेटा जोडला जावू शकतो. हा लॉक केवळ ५ सेकंदात उघडला जातो, असा कंपनीचा दावा आहे, या लॉकमध्ये एलईडी इंडिकेटर देण्यात आला आहे.
या लॉकला बनवण्यासाठी स्टेनलेस स्टीलचा वापर करण्यात आला आहे. यात IP66 रेटिंग देण्यात आली आहे. म्हणजेच धुळ, मातीचा यावर काहीही परिणाम होणार नाही. याचे वजन ५९ ग्रॅम आहे. यात १०० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी ३० मिनिटात फुल चार्ज होते. यात ५ वॅट स्मार्टफोन चार्जरने चार्ज करता येवू शकतो. एकदा फुल चार्ज झाल्यानंतर हा लॉक ६ महिन्यांपर्यंत याचा वापर करता येवू शकतो.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times