या व्हिडिओला फेसबुकवर याच कॅप्सनसह शेअर केले जात आहे. बस करा, इंडियावाल्यांनो, आम्हाला या ठिकाणी बसून व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवर करोना व्हायरसचे मजाक उडवणारे लोक आहेत. जर करोनाचा खरा चेहरा पाहायचा असेल तर चीनमधील हे व्हिडओ पाहा. एक वेळ नाही, दोन वेळ नाही, ३ वेळा पाहा. या ठिकाणी करोना व्हायरसची लागण झालेल्या लोकांना पकडण्यासठी पोलीस प्रशासनाला किती त्रास सहन करावा लागत आहे.
टाइम्स फॅक्ट चेकच्या एका वाचकाने आम्हाला याचा कॅप्शनसोबत हा व्हिडिओ आम्हाला आमचा व्हॉट्सअॅप नंबर 8527001433 वर पाठवला व खरी माहिती जाणून घ्यायची विनंती केली.
खरं काय आहे?
व्हिडिओ जुना आहे आणि तो हाँगकाँगमधील आहे. ज्या ठिकाणी राजकीय आंदोलनकर्त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी कारवाई केली होती. या व्हिडिओचा करोना व्हायरसशी काहीही संबंध नाही.
कशी केली पडताळणी?
गुगल क्रोमच्या इन व्हिडिओ एक्स्टेंशनचा वापर करून आम्ही व्हिडिओला अनेक फ्रेम्समध्ये विभागले. त्यानंतर वेगवेगळे सर्च करून त्याला रिवर्स सर्च केले.
यामुळे आम्हाला १ सप्टेंबर २०१९ रोजी यूट्यूबवर ‘ Free Press’कडून अपलोड केलेला व्हिडिओ मिळाला. याचे शीर्षक ‘Hong Kong riot police & tactical officers storm metro train and beat, arrest protesters’होते. या व्हिडिओचे व्हिज्युअल्स या व्हिडिओसारखेच आहेत. जो व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
आणखी थोडी पडताळणी केल्यानंतर आम्हाला The Guardian चे १ सप्टेंबर २०१९ रोजी प्रकाशित झालेल्या वृत्ताची लिंक मिळाली.
या बातमीचे शीर्षक
होते. या रिपोर्टनुसार, हिंसाचारा वाढल्यानंतर हाँगकाँग पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केला होता. त्यामुळे या व्हिडिओचा करोना व्हायरसशी काहीही संबंध नाही.
निष्कर्ष
हाँगकाँगमध्ये झालेल्या आंदोलनाचा व्हिडिओ करोना व्हायरसशी जोडून चुकीच्या दाव्याने शेअर केला जात आहे, असे मटा फॅक्ट चेकच्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times