हायलाइट्स:
- पुन्हा एका स्मार्टफोनमध्ये ब्लास्ट
- Poco M3 या बजेटमध्ये झाला धमाका
- युजरचा स्मार्टफोन यात पूर्णपणे जळाला
वाचा: Aadhaar: Aadhaar-UAN असे करा लिंक, लिंक करण्याची उद्या शेवटची तारीख, न केल्यास येतील ‘या’ समस्या
अलिकडेच एका ट्विटर युजर्सने जो पीडितेचा भाऊ आहे (@Mahesh08716488) ट्विट करून याबद्दल माहिती दिली आणि लिहिले की, My Brother Poco M3 मोबाईल स्फोट. या ट्विटमध्ये कोणत्या फोनचा स्फोट झाला याची माहिती देण्यात आली असून ट्विटसोबत Poco M3 चा एक फोटोही शेअर केला आहे, ज्यामध्ये फोन जळालेला दिसत आहे.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हे ट्विट नुकतेच पोस्ट केले गेले आहे आणि त्यात लिहिले आहे की, २७ नोव्हेंबर रोजी सकाळी झालेला Poco M3 स्फोट ब्लास्ट. या घटनेची माहिती देताना पीडितेच्या भावाने पोको मोबाईलला आग लागल्याचे कारण स्पष्ट केले नसून, फोन शॉर्ट झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. ज्या यूजर्सचा फोन Blast त्यांचे काही नुकसान झाले आहे की नाही. याची माहिती सध्या तरी देण्यात आलेली नाही. Poco M3 मोबाईल ब्लास्ट नंतरचे चित्र भीतीदायक आहे ते युजर्स चित्रात पाहू शकतात. फोनचा मागील पॅनल पूर्णपणे जळाला आहे आणि फोन पाहिल्यावर हे स्पष्ट होते की फोन दुरुस्तीच्या स्थितीत नाही.
कंपनीने स्पष्ट केले:

पीडित युजरच्या भावाने हे प्रकरण Poco M3 Blast वर ट्विट केलेअसता अॅक्शन मोडमध्ये आलेल्या Poco India सपोर्ट टीमने देखील ट्विटला उत्तर देताना लिहिले की, महेश आम्हाला हे जाणून वाईट वाटत आहे की, तुम्हाला स्मार्टफोनचा स्फोट ची समस्या सतावते आहे. कंपनीने युजरला आश्वासन दिले आहे की या समस्येवर सर्वोत्तम उपाय दिला जाईल.
अजूनही अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणे बाकी : Poco M3 ब्लास्टला जबाबदार कोण, फोनचा मालक की कंपनी?, असे अनेक प्रश्न आता युजर्ससमोर उपस्थित झाले आहे.
वाचा: Vivo Y55s : स्मार्टफोन बाजरात एन्ट्री करण्यास सज्ज Vivo चा ‘हा’ स्मार्टफोन, पाहा डिटेल्स
वाचा: Google Maps Tricks: मस्तच! पत्ता न टाकता Google Maps वर ‘या’ Shortcut ने शोधा रस्ता, पाहा ट्रिक्स
वाचा: Google Maps Tips :आता वारंवार क्रॅश होणार नाही Google Maps, या टिप्स करतील तुमची मदत
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times