गेल्या आठवड्यात एअरटेल आणि वीआयने आपल्या प्रीपेड प्लान्सच्या किंमती वाढवल्या होत्या. त्यानंतर आता रिलायन्स जिओने देखील आपल्या प्लान्सच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. जिओने प्रीपेड प्लान्सच्या किंमती जवळपास २१ टक्क्यांपर्यंत वाढवल्या आहेत. जिओच्या सर्वात स्वस्त प्लानची किंमत ७५ रुपये होती, जी आता ९१ रुपये झाली आहे. Jio च्या ९१ रुपयांच्या प्लानची वैधता २८ दिवस असून, यामध्ये एकूण ३ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि ५० एसएमएस मिळतात. एअरटेल आणि वोडाफोन आयडियाच्या सर्वात स्वस्त प्लानची किंमत ९९ रुपये आहे. जिओचे नवीन प्लान १ डिसेंबरपासून लागू होणार आहे. भारतातील प्रमुख टेलिकॉम कंपन्या असलेल्या जिओ, एअरटेल आणि वीआयने प्लान्सच्या किंमती वाढवत ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. तिन्ही कंपन्यांकडे २८, ५६ आणि ८४ दिवस वैधतेसह येणारे प्लान्स आहेत. याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

​Jio Vs Airtel Vs vi: २८ दिवस वैधतेसह येणारे प्लान्स

जिओ-वि-एअरटेल-वि-व्ही-

jioche योजना

 • जिओचा १२९ रुपयांचा प्लान आता १५५ रुपयांचा होणार आहे. यात २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि ३०० मेसेज मिळतात.
 • जिओच्यात १९९ रुपयांच्या प्लानची किंमत २३९ रुपये झाली असून, यात एकूण १.५ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० मेसेजची सुविधा मिळते.
 • २४९ रुपयांच्या प्लानसाठी आता २९९ रुपये खर्च करावे लागतील. यात दररोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० मेसेजची मिळतात.

वोडाफोन आयडियाचे प्लान

 • वोडाफोन आयडियाच्या १७९ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना २८ दिवसांसाठी २ जीबी डेटा, एकूण ३०० एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते.
 • वीआयच्या २६९ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज १०० एसएमएस, दररोज १ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. प्लानची वैधता २८ दिवस आहे.
 • vi च्या २९९ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना २८ दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि दररोज १.५ जीबी डेटा मिळतो.
 • Vi च्या ३५९ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना २८ दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि दररोज २ जीबी डेटा मिळेल.

एअरटेलचे प्लान

 • एअरटेलच्या १७९ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना १०० एसएमएस, अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटाची सुविधा मिळते. प्लानची वैधता २८ दिवस आहे.
 • एअरटेलच्या २६५ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना २८ दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि दररोज १.५ जीबी डेटाची सुविधा मिळते.
 • ग्राहकांना ३५९ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग, दररोज २ जीबी डेटा आणि १०० एसएमएसची सुविधा मिळते. प्लानची वैधता २८ दिवस आहे.

​Jio Vs Airtel Vs vi: ५६ दिवस वैधतेसह येणारे प्लान

जिओ-वि-एअरटेल-वि-व्ही-

jioche योजना

 • जिओच्या ४७९ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना दररोज १.५ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएस मिळतात. प्लानची वैधता ५६ दिवस आहे.
 • जिओच्या ५३३ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते.

एअरटेलचे प्लान

 • ५६ दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या प्लानची किंमत ४७९ रुपये असून, यात दररोज दररोज १.५ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएसची सुविधा मिळते.
 • ५४९ रुपयांच्या प्लानमध्ये ५६ दिवसांसाठी २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि१०० एसएमएसची सुविधा मिळते.

वोडाफोन आयडियाचे प्लान

 • वीआयच्या ४७९ रुपयांच्या प्लानची वैधता ५६ दिवस असून, यात दररोज १.५ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएस मिळतात.
 • ५३९ रुपयांच्या प्लानची वैधता ५६ दिवस असून, यात दररोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएसची सुविधा मिळते.

​Jio Vs Airtel Vs vi: ८४ दिवस वैधतेसह येणारे प्लान्स

जिओ-वि-एअरटेल-वि-व्ही-

jioche योजना

 • जिओच्या ३९५ रुपयांच्या प्लानमध्ये ८४ दिवसांसाठी एकूण ६ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि १००० मेसेज मिळतात.
 • कंपनीच्या ६६६ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना एकूण १.५ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० मेसेजची सुविधा मिळते.
 • जिओच्या ७१९ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० मेसेज मिळतात.

एअरटेलचे प्लान

 • ८४ दिवस वैधतेसह येणाऱ्या या प्लानची किंमत ४५५ रुपये असून, यात एकूण ६ जीबी डेटा, दररोज १०० एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळेल.
 • ७१९ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज १.५ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० मेसेजची सुविधा मिळते.
 • ८३९ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० मेसेजची सुविधा मिळते.

​वीआयचे ८४ दिवस वैधतेसह येणारे प्लान्स

 • ८४ दिवस वैधतेसह येणाऱ्या ४५९ रुपयांच्या प्लानमध्ये एकूण ६ जीबी डेटा, दररोज १०० एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते.
 • ७१९ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज १.५ जीबी डेटा, दररोज १०० एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जात आहे.
 • वोडाफोन आयडियाचा ६९९ रुपयांचा प्रीपेड प्लान आता ८३९ रुपयांचा झाला आहे. या प्लानची वैधता ८४ दिवस असून, यात दररोज २ जीबी डेटा, दररोज १०० एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here