नवी दिल्लीः भारतात २०१६ पासून टेलिकॉम इंडस्ट्रीजची परिस्थिती दयनीय होत होती. रिलायन्स जिओच्या लाँचिंगनंतर भारतात फ्री डेटा आणि कॉलिंगची सुविधा देण्यासाठी लागलेल्या स्पर्धेमुळे टेलिकॉम इंडस्ट्री रसातळाला गेली. आजची टेलिकॉम क्षेत्राची परिस्थिती अत्यंद दयनीय अशी झाली आहे. सोडले तर एअरटेल, व्होडाफोन, आयडिया यासह सर्वच कंपन्यांना तोटा सहन करावा लागत आहे. या कंपन्यांची सध्याची परिस्थिती अशी आहे, की त्यांना एजीआर (राहिलेली रक्कम) भरायला त्यांच्याकडे पैसे नाहीत. सुप्रीम कोर्टाने त्यांना डेडलाइन देवूनही ते पैसे भरू शकत नाहीत.

भारतासोबत चिनी टेलिकॉमची स्थितीही दयनीय आहे. चीनची प्रमुख टेलिकॉम कंपनी चायना मोबाइलने एका महिन्यात ७.२५ मिलियन म्हणजेच ७२.५ लाख ग्राहक गमावले आहेत. चायना मोबाइलने नुकताच दोन महिन्यांचा ऑपरेटिंग डेटा शेअर केला आहे. त्यात कंपनीने ७२.५ लाख युजर्स गमावले आहेत. हा आकडा मोबाइलचा एकूण ९४.२ कोटी युजर्सच्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे. परंतु, चायना मोबाइलच्या २३ वर्षात पहिल्यांदा असे झाले आहे. चायना मोबाइलला सोडून अन्य कंपन्यांची सेवा लोकांनी स्वीकारली आहे. ezone.ulifestyle.com.hk च्या एका रिपोर्टनुसार, १९९७ पासून प्रत्येक महिन्याला युजर्सचा डाटा प्रसिद्ध करीत आहे. याआधी कंपनीने जानेवारी २०२० मध्ये ही आकडेवारी प्रसिद्ध केली होती.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here