हायलाइट्स:

  • OnePlus Band वर जबरदस्त ऑफर
  • ऑफर मर्यादित काळासाठी
  • युजर्सची होणार मोठी बचत

नवी दिल्ली: या वर्षी मार्चमध्ये OnePlus Watch लाँच करण्यापूर्वी कंपनीने जानेवारीमध्ये आपला फिटनेस बँड लाँच केला होता. वनप्लस बँड हा कंपनीचा सर्वात परवडणारा स्मार्ट बँड असून सध्या हा बँड लाँचच्या किंमतीपेक्षा १००० रुपयांनी स्वस्तात विकला जात आहे, परंतु येथे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे ही मर्यादित कालावधीची डील आहे, त्यामुळे तुम्ही OnePlus Band खरेदी करण्याचा विचार करत असाल तर असल्यास, तुमच्याकडे आता चांगली संधी आहे.

वाचा: Smart TV Offers: ‘या’ कंपनीचा ४० इंचाचा Smart TV खरेदी करा ६ हजारात, ऑफर मर्यादित काळासाठी


OnePlus Band ची भारतात किंमत :

OnePlus स्मार्ट बँड या वर्षी २,४९९ रुपयांच्या किमतीत लाँच करण्यात आला होता. परंतु, आता तुम्हाला हा फिटनेस बँड Amazon वर १००० रुपयांच्या मोठ्या डिस्काउंटनंतर १४९९ रुपयांना मिळेल. हा बँड तुम्हाला फक्त काळ्या रंगाच्या प्रकारात मिळेल.

वनप्लस बँड १

तुम्ही पाहू शकता की डील मर्यादित कालावधीसाठी असून त्यात टाइमर देखील चालू आहे.

वनप्लस बँड 2

या स्मार्ट बँडसह स्पर्धा : OnePlus स्मार्ट बँड इतका स्वस्त झाला आहे. की, तो बाजारात असलेल्या Mi Band 5 (किंमत २,४९९ रुपये ) आणि Honor Band 6 (किंमत २,९९९ रुपये ) यांसारख्या इतर कंपन्यांच्या बँडशी थेट स्पर्धा करेल.

OnePlus Band: वैशिष्ट्ये

या OnePlus बँडमध्ये १.१ -इंच AMOLED स्क्रीन देण्यात आली आहे, ज्याचे रिझोल्यूशन १२६ x २९४ पिक्सेल आहे. बँडशी सुसंगत असलेल्या ऍप्लिकेशन्सच्या मदतीने अनेक बँड फेसेस लागू केले जाऊ शकतात. बँड ब्राइटनेस लेव्हल ऍडजस्टमेंट पर्यायासह येतो. जो, तुम्हाला बॅटरी वाचविण्यात मदत करू शकतो. यामध्ये तुम्हाला टच-स्क्रीनसह फुल टच कंट्रोल मिळेल. पाण्याच्या संरक्षणासाठी बँड 5ATM रेटिंगसह येतो.

तुम्हाला या बँडवर नोटिफिकेशन अलर्ट मिळतील. हा बँड एका चार्जमध्ये २ आठवड्यांसाठी सपोर्ट करेल. आरोग्य वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे तर, बँड ऑप्टिकल हार्ट रेट सेन्सर आणि SpO2 म्हणजेच ब्लड ऑक्सिजन सेन्सरसह येतात. याशिवाय यात तुम्हाला १३ स्पोर्ट्स मोड मिळतील.

वाचा: Phone tricks : पासवर्ड विसरला असाल तर त्याशिवाय ‘असा’ अनलॉक करा iPhone, पाहा स्टेप्स

वाचा: Smartphone Tips: फोनमधील App मुळे तर तुमचा स्मार्टफोन स्लो झाला नाहीये? असे करा माहित, पाहा स्टेप्स

वाचा: Redmi: भारतात Redmi Note 10S च्या नवीन Variant चा सेल आजपासून, पाहा काय आहे खास

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here