Itel it2173

किंमतीबद्दल सांगायचे तर Itel it2173 ची सुरुवाती किंमत फक्त ९४९ रुपये आहे. फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल सांगायचे तर Itel it2173 फीचर फोनमध्ये १.८ इंच टीएफटी डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १२८x१६० पिक्सल आहे. या फोनमध्ये १००० एमएएचची बॅटरी दिली आहे, जी सिंगल चार्जमध्ये अनेक तास टिकते. फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ०.३ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला आहे. यात ड्यूल सिम कनेक्टिव्हिटीचा सपोर्ट दिला आहे.
लावा A1

किंमतीबद्दल सांगायचे तर Lava A1 फीचर फोनला तुम्ही फक्त ९३९ रुपये सुरुवाती किंमतीत खरेदी करू शकता. फीचर्सबद्दल सांगायचे तर Lava A1 मध्ये १.८ इंच डिस्प्ले दिला आहे. तर पॉवरसाठी यात ८०० एमएएचची बॅटरी मिळते. फोटोग्राफीसाठी यात ०.३ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात ब्लूटूथ सपोर्ट दिला आहे. फोन ड्यूल सिम सपोर्टसह येतो. Lava A1 ला तुम्ही Green, Midnight Black , Ivory White, Light Blue आणि Magenta Red रंगात खरेदी करू शकता.
कार्बन KX10i

Karbonn KX10i फीचर फोनची सुरुवाती किंमत ८७० रुपये आहे. या शानदार फीचर फोनमध्ये १.८ इंच डिस्प्ले दिला आहे. तर पॉवरसाठी ८०० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. यात ३२ एमबी रॅम आणि ३२ एमबी स्टोरेज दिले आहे. तसेच, मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने ३२ जीबी पर्यंत स्टोरेजला वाढवू देखील शकता. Karbonn KX10i या फीचर फोनमध्ये ड्यूल सिम कनेक्टिव्हिटीचा सपोर्ट दिला आहे.
इनफोकस हिरो १

InFocus Hero 1 या फीचर फोनला तुम्ही ८१० रुपयांच्या सुरुवाती किंमतीत खरेदी करू शकता. या फोनमध्ये १.७७ इंच डिस्प्ले दिला आहे. तर पॉवरसाठी ८०० एमएएचची दमदार बॅटरी मिळते. यात ०.३ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि सिंगल सिम कनेक्टिव्हिटी दिली आहे.
आय कॉल K38 फ्लिप
I Kall K38 Flip फीचर फोन ८९९ रुपये किंमतीत उपलब्ध आहे. फोनमध्ये १.८ इंच डिस्प्ले दिला आहे. तर पॉवरसाठी ८०० एमएएचची बॅटरी मिळते. रियरला ०.३ मेगापिक्सल कॅमेरा मिळतो. फोन सिंगल सिम कनेक्टिव्हिटीसह येतो.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times