या ग्राफिक कार्डवरील मजकुरात लिहिलेय की, रशियाने जवळपास ५०० हून अधिक सिंह रस्स्त्यावर सोडले आहेत. लोकांना घरात राहण्याचा सल्ला दिला आहे. जे लोक घराबाहेर पडत आहे. त्यांना रोखण्यासाठी रशिया सरकारने हे पाऊल उचललं आहे. ब्लादिमीर पुतीन यांनी हा धाडसी निर्णय घेतला आहे.
काही सोशल मीडियावर युजर्संनी हाच फोटो शेअर केला आहे. परंतु, यात फक्त सिंह दिसत आहे. टीव्हीची इमेज दिसत नाही. परंतु, दावा मात्र हाच करण्यात आला आहे. ट्विटर युजर्संनीही याच दाव्यासह हा फोटो शेअर केला आहे. ट्विटर हँडल ‘@Mavunya_’ ट्विट करून म्हटले की, रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी ८०० सिंह आणि वाघ रशियाच्या रस्त्यावर सोडले आहेत. करोनाला रोखण्यासाठी लोकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. घराबाहेर पडल्यास वाघ-सिंह त्यांना मारून टाकतील.
हे दोन्ही फोटो फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत.
खरं काय आहे?
सिंहाचा दिसत असलेला फोटो हा दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्गमधील २०१६ चा आहे. हा फोटो रशियाचा नाही, तसेच या फोटोचा करोनाशी काहीही संबंध नाही.
ब्रेकिंग न्यूज ग्राफिकच्या मदतीने हा फोटो बनवण्यात आला आहे.
कशी केली पडताळणी?
अगदी सोप्या पद्धतीने या फोटोला रिवर्स करून सर्च केले. त्यावेळी आम्हाला मेट्रो यूके ची १५ एप्रिल २०१६ रोजी ची बातमीची लिंक मिळाली. या बातमीचे शीर्षक
असे होते. या बातमीत काही फोटो यातील होते. या फोटोचे क्रेडिट कॅटर्स न्यूजला दिले होते.
दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्गमध्ये या सिंहाला आणण्यात आले होते. कोलंबस मध्ये एका स्थानिक चित्रपटाची शूटिंग सुरू होती, यासाठी या सिंहाला आणण्यात आले होते. परंतु, प्रोडक्शन कंपनीने यासाठी आवश्यक ती परवानगी घेतली नव्हती.
त्यामुळे हे स्पष्टपणे दिसतेय की, हा फोटो २०१६ चा आहे. या फोटोचा रशियाशी, ब्लादिमीर पुतीन आणि करोनाशी काहीही संबंध नाही.
ब्रेक यूवर ऑन न्यूज ही वेबसाइट लोकांना ग्राफिक कार्डच्या मदतीने त्यांना त्यांची ब्रेकिंग न्यूज बनवण्याची परवानगी देते.
निष्कर्ष
रशियात करोनाला रोखण्यासाठी तसेच घराबाहेर पडणाऱ्या लोकांना रोखण्यासाठी सरकारने ५०० सिंह रस्त्यावर सोडले आहे, असा जो दावा करण्यात येत आहे, तो साफ खोटा आहे, हा फोटो २०१६ मधील दक्षिण आफ्रिकेचा आहे, असे ‘मटा फॅक्ट चेक’च्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times