देशातील प्रमुख नेटवर्क प्रोव्हाइडर कंपनी Airtel ने आपल्या प्रीपेड प्लान्समधील Disney+ Hotstar बेनिफिट्स कमी केले होते. प्रीपेड प्लान्सच्या किंमती वाढवल्यानंतर कंपनी केवळ एकाच प्रीपेड प्लानमध्ये हे बेनिफिट्स देत आहे. टेलिकॉम कंपनी जिओने देखील नवीन प्लान्सला वेबसाइटवर अपडेट केले असून, यात तीन रिवाइज्ड प्रीपेड प्लान्समध्ये स्ट्रीमिंग बेनिफिट्सचा समावेश केला आहे. जिओच्या वेबसाइटवर आतापर्यंत ६०१ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये स्ट्रीमिंग बेनिफिट्स मिळत होते. या प्लानमध्ये अनलिमिटेड वॉइस कॉलिंग, दररोज ३ जीबी डेटा, दररोज १०० एसएमएससह अतिरिक्त ६ जीबी डेटा आणि १ वर्षासाठी Disney+ Hotstar चे सबस्क्रिप्शन मिळते. आता जिओ ७९९ रुपये, १,०६६ रुपये आणि ३,११९ रुपयांच्या प्रीपेड प्लान्ससोबत देखील Disney+ Hotstar बेनिफिट्स देत आहे. ६५९ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये देखील Disney+ Hotstar बेनिफिट्ससह दररोज १.५ जीबी डेटा आणि ५६ दिवसांची वैधता मिळते.

​Jio चा ३,११९ रुपयांचा प्लान

जिओ-

टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओच्या ३,११९ रुपयांच्या प्रीपेड प्लानची वैधता ३६५ दिवस आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना दररोज २ जीबी डेटा मिळतो. याशिवाय अतिरिक्त १० जीबी डेटा देखील मिळत आहे. प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड वॉइल कॉलिंगची सुविधा मिळते. तसेच, दररोज १०० एसएमएस देखील मिळतात. अन्य फायद्यांबद्दल सांगायचे तर प्लानमध्ये Jio अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस मिळतो. तसेच, या प्लानमध्ये यूजर्सला १ वर्षासाठी Disney+ Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन दिले जात आहे.

​Jio चा ७९९ रुपयांचा प्लान

जिओ-

रिलायन्स जिओच्या ७९९ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये यूजर्सला दररोज २ जीबी डेटा दिला जात आहे. म्हणजेच एकूण ११२ जीबी डेटा मिळतो. तसेच, प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा दिला जात आहे. अन्य फायद्यांबद्दल सांगायचे तर प्लानमध्ये JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud चा अ‍ॅक्सेस मिळतो. या प्लानमध्ये १ वर्षासाठी Disney+ Hotstar Mobile बेनिफिट्स देखील दिले जात आहे. या प्लानची वैधता ५६ दिवस आहे.

​Jio चा १,०६६ रुपयांचा प्लान

जिओ-

Jio च्या १,०६६ रुपयांच्या प्लानमध्ये यूजर्सला दररोज २ जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये अतिरिक्त ५ जीबी डेटा दिला जात आहे. तसेच, अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळत आहे. प्लानमध्ये मिळणाऱ्या अन्य फायद्यांबद्दल सांगायचे तर यात JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud चा अ‍ॅक्सेस मिळतो. ओटीटी बेनिफिट्समध्ये १ वर्षासाठी Disney+ Hotstar Mobile बेनिफिट्स दिले जात आहे. या प्लानची वैधता ८४ दिवस आहे.

​Disney+ Hotstar चे सबस्क्रिप्शन

डिस्ने-हॉटस्टार-

Disney+ Hotstar ने याच वर्षाच्या सुरुवातीला ४९९ रुपयांचा प्लान आणला आहे. कंपनीने ३९९ रुपयांचा प्लान बंद केला आहे. यूजर्सला आता प्लान्समध्ये सर्व कॉन्टेंटचा अ‍ॅक्सेस मिळेल. मात्र ऑडिओ आणि व्हिडिओ क्वालिटीमध्ये बदल होईल. किंमतीनुसार, Disney+ Hotstar कडे तीन वेगवेगळे प्लान्स आहेत. यामध्ये वर्षभरासाठीचा ४९९ रुपयांचा मोबाइल प्लान, ८९९ रुपयांचा सुपर प्लान आणि १,४९९ रुपयांच्या प्रीमियम प्लान्सचा समावेश आहे. जिओच्या प्लान्समध्ये हे बेनिफिट्स मोफत मिळतात.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here