LAVA Z61 Pro

LAVA Z61 Pro स्मार्टफोनची किंमत ५,३९९ रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये ५.४५ इंच डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १४४०x७२० पिक्सल आहे. या डिव्हाइसमध्ये फेस अनलॉकची देखील सुविधा दिला आहे. यात मीडियाटेक ऑक्टा-कोर प्रोसेसरसह २ जीबी रॅम आणि १६ जीबी इंटर्नल स्टोरेज दिले आहे. फोटोग्राफीसाठी LAVA Z61 Pro स्मार्टफोनमध्ये एलईडी फ्लॅश लाइटसाठी ८ मेगापिक्सल रियर कॅमेरा दिला आहे. तर फ्रंटला ५ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा मिळतो.
Panasonic Eluga I6

Panasonic Eluga I6 स्मार्टफोनची किंमत ६ हजार रुपयांपेक्षा कमी आहे. या स्मार्टफोनमध्ये रियर पॅनेलला एलईडी फ्लॅश लाइटसह ८ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा दिला आहे. तर फ्रंटला सेल्फीसाठी ८ मेगापिक्सल कॅमेरा दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर, ओटीजी सपोर्ट आणि ५.४५ इंच शानदार डिस्प्ले मिळतो. तर पॉवरसाठी ३००० एमएएचची बॅटरी दिली आहे. हा फोन अँड्राइड Pie v९.० वर काम करतो. या फोनची किंमत ५,४८९ रुपये आहे.
अल्काटेल 5V

Alcatel 5V स्मार्टफोनची किंमत देखील ७ हजार रुपयांपेक्षा कमी आहे. या फोनमध्ये ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटर्नल स्टोरेज दिले आहे. फोनमध्ये ६.२ इंच शानदार डिस्प्ले दिला आहे. तर पॉवरसाठी स्मार्टफोनमध्ये ४००० एमएएचची दमदार बॅटरी मिळते. फोनमध्ये फोटोग्राफीसाठी रियरला १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. तर सेल्फीसाठी फ्रंटला १३ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. Alcatel 5V स्मार्टफोनला तुम्ही ६,९९० रुपये किंमतीत खरेदी करू शकता.
itel Vision2S

itel Vision2S स्मार्टफोनची किंमत फक्त ६,८२८ रुपये आहे. या डिव्हाइसमध्ये पॉवरसाठी ५००० एमएएचची दमदार बॅटरी मिळते.आयटेलच्या या फोनमध्ये ६.५२ इंच एचडी प्लस आयपीएस डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये सुरक्षेसाठी फिंगरप्रिंट सेंसर, फेस अनलॉकचा सपोर्ट मिळतो. फोटोग्राफीसाठी यात ८ मेगापिक्सलचा ड्यूल एआय रियर कॅमेरा आणि सेल्फीसाठी फ्रंटला ५ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. itel Vision2S मध्ये २ जीबी रॅम आणि ३२ जीबीपर्यंत स्टोरेज मिळते.
नोकिया C01 प्लस

तुम्ही जर स्वस्त ब्रँडेड स्मार्टफोन शोधत असाल तर Nokia C01 Plus हा एक चांगला पर्याय ठरू शकता. हा फोन ६,९७८ रुपये किंमतीत उपलब्ध आहे. नोकियाच्या या स्मार्टफोनमध्ये ५.४५ इंच शानदार डिस्प्ले दिला आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि सेल्फीसाठी २ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. तसेच, पॉवरसाठी ३००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. फोन ऑक्टा-कोर प्रोसेसरसह सपोर्ट मिळतो. हा फोन अँड्राइड ११ गो एडिशनवर काम करतो.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times