भारतीय बाजारात स्मार्टफोनप्रमाणेच आता स्मार्ट टीव्हीची मागणी देखील प्रचंड वाढली आहे. अनेक स्मार्टफोन कंपन्या देखील आता या सेगमेंटमध्ये उतरल्या असून, एकापेक्षा एक शानदार स्मार्ट टीव्ही सादर करत आहे. बाजारात वेगवेगळ्या साइज आणि वेगवेगळ्या प्राइज रेंजमध्ये येणाऱ्या अनेक स्मार्ट टीव्ही उपलब्ध आहेत. तुम्ही जर घरातील जुना टीव्ही बदलून मोठा स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर बाजारात काही चांगले पर्याय उपलब्ध आहे. लेटेस्ट अँड्राइड ऑपरेटिंग सिस्टमसह येणाऱ्या स्मार्ट टीव्हींना तुम्ही ३२ हजार रुपये सुरुवाती किंमतीत खरेदी करू शकता. ४के अल्ट्रा एचडी डिस्प्लेसह येणाऱ्या या स्मार्ट टीव्हींवर तुम्ही चित्रपट, सीरिज पाहण्याचा आनंद घेऊ शकता. ५५ इंच स्क्रीन साइजमध्ये तुम्ही Westinghouse, Mi, LG, Panasonic आणि Acer सारख्या कंपन्यांचे शानदार स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकता.

Westinghouse 4K अल्ट्रा HD स्मार्ट प्रमाणित Android LED TV

Westinghouse-4k-ultra-hd-smart-certified-android-led-tv

५५ इंच स्क्रीन साइजसह येणाऱ्या Westinghouse 4K Ultra HD Smart Certified Android LED TV ला तुम्ही ३२,९९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. याचे रिझॉल्यूशन ३८४०x२१६० पिक्सल, व्ह्यूइंग अँगल १७८ डिग्री, रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आहे. स्मार्ट टीव्हीमध्ये ४० वॉट साउंड आउटपूट स्पीकर, सराउंड साउंड टेक्नोलॉजी दिली आहे. यात एचडीआर१० सपोर्ट मिळते. यामध्ये २ जीबी रॅम आणि ८ जीबी स्टोरेज दिले आहे. तसेच, दोन स्पीकर मिळतात. हा टीव्ही अँड्राइड ९.० Pie वर काम करतो.

Mi 4K अल्ट्रा HD Android स्मार्ट एलईडी टीव्ही

mi-4k-ultra-hd-android-smart-led-tv

Mi 4K Ultra HD Android Smart LED TV मध्ये ५५ इंच डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन ३८४०x २१६० पिक्सल आहे. या टीव्हीमध्ये ४के एचडीआर सपोर्ट मिळतो. तसेच, यात Dolby+ DTS-HD टेक्नोलॉजीचा देखील सपोर्ट दिला आहे. यात २० वॉट साउंड आउटपूट, बिल्ट-इन वाय फाय, पॅचवॉल सारखे फीचर्स मिळतात. टीव्ही नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ सारख्या अ‍ॅप्सचा सपोर्ट दिला आहे. एमआयच्या या टीव्हीला तुम्ही ४४,९९९ रुपयात खरेदी करू शकता.

LG 4K अल्ट्रा HD स्मार्ट एलईडी टीव्ही

lg-4k-अल्ट्रा-एचडी-स्मार्ट-लेड-टीव्ही

LG 4K Ultra HD Smart LED TV मध्ये देखील ५५ इंचचा शानदार डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन ३८४०x२१६० पिक्सल आहे. याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. यात AI ThinQ, बिल्ड इन गुगल असिस्टेंट आणि अ‍ॅलेक्सा सपोर्ट मिळतो. तसेच, २० वॉट्स साउंड आउटपूट, Quad Core प्रोसेसर दिला आहे. हा टीव्ही WebOS वर काम करतो.एलजीच्या या स्मार्ट टीव्हीला तुम्ही ५१,९९० रुपयात खरेदी करू शकता.

Panasonic 4K अल्ट्रा HD स्मार्ट Android LED TV

panasonic-4k-ultra-hd-smart-android-led-tv

Panasonic 4K Ultra HD Smart Android LED TV मध्ये ५५ इंच स्क्रीन दिली असून, याचे रिझॉल्यूशन ३८४०x२१६० पिक्सल, रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आहे. टीव्ही ३ एचडीएमआय पोर्ट आणि एक सेटअप बॉक्स सपोर्टसह येतो. यात २ यूएसबी पोर्ट, हार्ड ड्राइव्ह आणि यूएसबी डिव्हाइसचा सपोर्ट मिळतो. याचा व्ह्यूइंग अँगल १७८ डिर्गी आहे. टीव्ही एचडीआर, नॉइज रिडक्शन, एचडीआर १०+ सपोर्ट, Web OS, बिल्ड-इन क्रोम कास्ट, वाइस कंट्रोल सारख्या फीचर्ससह येतो. टीव्ही ५६,१६७ रुपयात उपलब्ध आहे.

Acer 4K अल्ट्रा HD Android स्मार्ट एलईडी टीव्ही

acer-4k-ultra-hd-android-smart-led-tv

Acer 4K Ultra HD Android Smart LED TV मध्ये ५५ इंच डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन ३८४०x२१६० पिक्सल आहे. या स्मार्ट टीव्हीला तुम्ही फक्त ३४,९९९ रुपयात खरेदी करू शकता. यामध्ये २४ वॉट स्पीकर्ससह Dolby Audio आणि Pure Sound २ सपोर्ट दिला आहे. यात पॉवरफुल ऑडिओ व्ह्यूजल्स एक्सपीरियन्ससाठी ६४-बिट क्वाड कोर प्रोसेसरचा सपोर्ट मिळतो. टीव्ही २ जीबी रॅम आणि १६ जीबी स्टोरेज दिले आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here