सध्या बाजारात वायर्ड इयरफोनच्या तुलनेत TWS इयरबड्सची लोकप्रियता अधिक आहे. ग्राहक वायर्ड इयरफोन सोडून वायरलेस इयरबड्सला प्राधान्य देत आहे. ब्लूटूथद्वारे सहज स्मार्टफोन व इतर डिव्हाइसशी वायरलेस कनेक्ट करता येत असल्याने TWS इयरबड्सला पसंती मिळत आहे. तुम्ही जर स्वतःसाठी अथवा इतरांना गिफ्ट देण्यासाठी नवीन इयरबड्स खरेदी करण्याचा विचार करत असाल तर बाजारात कमी किंमतीत शानदार फीचर्ससह येणारे डिव्हाइस उपलब्ध आहे. या इयरबड्समध्ये तुम्हाला टच कंट्रोल, दमदार बॅटरी लाइफ आणि लो लेटेंसी मोड सारखे फीचर्स मिळतात. भारतीय बाजारात २ हजारांच्या बजेटमध्ये काही चांगले इयरबड्स मिळतात. या किंमतीत तुम्ही Boult Audio AirBass GearPods, PTron Bassbuds Jade, Dizo Buds Z TWS Earbuds, Lava Probuds 2 आणि Noise Buds VS102 सारखे बड्स मिळतील. या इयरबड्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

बोल्ट ऑडिओ एअरबास गियरपॉड्स

boult-audio-airbass-gearpods

ई-कॉमर्स साइट Flipkart वर Boult Audio AirBass GearPods इयरबड्स १,२९९ रुपये किंमतीत उपलब्ध आहे. यामध्ये फ्री डीप बेससाठी मायक्रो वूफर दिले आहेत. याची बॅटरी ३२ तास टिकते. तसेच, १० मिनिटांच्या चार्जिंगमध्ये १०० तास वापर करू शकता. यासोबत एक्स्ट्रा सेंसिटिव्ह इन-बिल्ट मायक्रफोन देखील दिले आहेत. पाणी आणि धुळीपासून सुरक्षेसाठी याला IPX५ सर्टिफिकेशन मिळाले आहे. दोन्ही बड्समध्ये टच कंट्रोलचा सपोर्ट दिला आहे.

PTron Bassbuds जेड

ptron-bassbuds-jade

PTron Bassbuds Jade ला Amazon वरून १,४९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. हे गेमिंग इयरबड्स स्लिक आणि पोर्टेबल डिझाइनसह येतात. याच्या चार्जिंग केसमध्ये ३०० एमएएचची बॅटरी दिली आहे. एकदा चार्ज केल्यास इयरबड्स ४० तास वापरू शकता. यामध्ये ६०ms अल्ट्रा लो लेटेंसी मिळते. Bassbuds Jade मध्ये ड्यूल एचडी माइक दिला आहे. याजे वजन फक्त ४ ग्रॅम असून, यामध्ये टच कंट्रोलचा देखील सपोर्ट मिळतो.

डिझो बड्स Z TWS इअरबड्स

dizo-buds-z-tws-earbuds

Dizo Buds Z TWS Earbuds ला तुम्ही १,९९९ रुपये सुरुवाती किंमतीत खरेदी करू शकता. या इयरबड्समध्ये ऑडिओ क्वालिटीसाठी १०एमएम डायनॅमिक ड्रायव्हर्स दिले आहे. यात टच जेस्चर कंट्रोल देखील मिळतो. याद्वारे म्यूझिक प्ले आणि पॉजसाठी डबल टॅप करू शकता. पाण्यापासून सुरक्षेसाठी बड्सला IPX4-रेटिंग मिळाले आहे. याची बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर ४.५ तास वापरू शकता. बड्समध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ ५.० चा सपोर्ट मिळतो.

लावा प्रोबड्स २

lava-probuds-2

ई-कॉमर्स साइट Amazon आणि Flipkart वरून Lava Probuds 2 ला १,६९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. यामध्ये १४ एमएम डायनॅमिक ड्रायव्हर्स दिले आहेत. तसेच, कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ वी५.० चा सपोर्ट मिळतो. चार्जिंग केससह एकदा चार्ज केल्यानंतर बड्सला २३ तास वापरू शकता. पाणी आणि घामापासून सुरक्षेसाठी IPX५ सर्टिफिकेशन दिले आहे. टच कंट्रोलसह वॉइस असिस्टेंटला देखील कंट्रोल करू शकता. यामध्ये इंस्टंट वेक अँड पेअर टेक्नोलॉजी दिली आहे.

नॉइज बड्स VS102

noise-buds-vs102

Noise Buds VS102 ची किंमत १,२९९ रुपये आहे. या बड्सला तुम्ही फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता. यामध्ये ११ एमएम ड्रायव्हर दिले आहे. तसेच, वॉटर रेसिस्टेंटसाठी आयपीएक्स५ रेटिंग मिळाले आहे. यामध्ये फुल टच कंट्रोलचा सपोर्ट दिला असून, याद्वारे म्यूझिक एडजस्टमेंट, वॉल्यूमेंट चेंज आणि कॉल कंट्रोलचा सपोर्ट मिळतो. कनेक्टिव्हिटीसाठी यात ब्लूटूथ ५.१ चा सपोर्ट मिळतो. यामध्ये गुगल असिस्टेंट आणि सिरी सारख्या वॉइस असिस्टेंटचा देखील सपोर्ट दिला आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here