करोना व्हायरसची जगभरात भीती पसरली जात असताना सोशल मीडियातील व्हॉट्सअॅपवर सध्या एक मेसेज खूप मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. अमेरिकेच्या ‘’ने अखेर करोना व्हायरसचे औषध (व्हॅक्सिन) तयार केले आहे.

या दाव्यासह काही प्लास्टिक पाउचचे फोटो शेअर केले जात आहेत. ज्यावर ‘ IgM/IgG’ लिहिले आहे. या फोटोसोबत एक मेसेज लिहिला आहे, जगासाठी एक आनंदाची आणि मोठी बातमी आहे. करोना व्हायरसची व्हॅक्सिन तयार करण्यात आली आहे. ही रुग्णांना बरं करण्यात सक्षम आहे. अमेरिकेच्या वैज्ञानिकांना सलाम. आताच ट्रम्प यांनी ही घोषणा केली आहे. Roce medical company पुढील रविवारी ही व्हॅक्सिन लाँच करणार आहे.

टाइम्स फॅक्ट चेकला हा मेसेज खूप सर्व आमच्या वाचकांनी आमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाठवला व याची सत्यता जाणून घेण्याची विनंती केली.

खरं काय आहे?
‘Covid-19 IgM/IgG’ टेस्टिंगची किट आहे. व्हॅक्सिन नाही. या किटचा Roche Diagnostics शी काहीही संबंध नाही. याला ने बनवले आहे. आता पर्यंत करोना व्हायरससाठी कोणतीही व्हॅक्सिन नाही.

कशी केली पडताळणी?

गुगलवर ‘Covid-19 IgM/IgG’ कीवर्ड सर्च केल्यानंतर आम्हाला या टेस्टिंगसंबंधीच्या किटची माहिती मिळाली. १७ मार्च २०२० रोजी छापलेली
ची एक लिंक मिळाली.

शेअर करण्यात येत असलेला फोटो ध्यानाने पाहिल्यास यावर दक्षिण कोरियाई ब्रँडचा ‘Sugentech’ चा लोगो दिसतो.

या कंपनीची अधिकृत
वर जावून आम्ही प्रोडक्ट्सचे नाव सर्च केले तर आम्हाला या यादीत ‘Covid-19 IgM/IgG’दिसले.

या पेजवर हे स्पष्टपणे लिहिलेय की, आता पर्यंत Covid-19 च्या उपचारासाठी कोणतेही औषध नाही. त्यामुळे संसर्ग टाळायचा असले तर एकांत हेच औषध आहे.

आता पर्यंत Covid-19 च्या उपचारासाठी कोणत्याही FDA ची मंजुरी मिळाली नाही.

निष्कर्ष

Covid-19 टेस्ट किटचा फोटो व्हॉट्सअॅपवर खोट्या दाव्यासह शेअर केला जात आहे, असे मटा फॅक्ट चेकच्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here