IQOO Z3

IQOO Z3 स्मार्टफोनच्या खरेदीवर २ हजार रुपयांचे कूपन दिले जात आहे. सोबतच, फोनवर २ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील मिळते. डिव्हाइसला ९ महिन्यांच्या ईएमआयवर खरेदी करू शकता. डिस्काउंटनंतर फोनला सेलमध्ये तुम्ही १७,९९० रुपये किंमतीत खरेदी करू शकता. फोन खरेदीवर २ हजार रुपये अतिरिक्त डिस्काउंट देखील मिळेल. फोनवर ५५ वॉट फ्लॅश चार्ज सपोर्टसह ४४०० एमएएचची बॅटरी, १२० हर्ट्ज रिफ्रेश रेट डिस्प्ले, Qualcomm Snapdragon ७६८G ५G प्रोसेसरचा सपोर्ट मिळतो.
IQOO Z5

सेलमध्ये iQOO Z5 स्मार्टफोन खरेदीवर २ हजार रुपयांचे कूपन दिले जात आहे. सोबतच, ३ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळेल. फोनला ९ महिन्यांच्या ईएमआयवर खरेदी करू शकता. तसेच ३ हजार रुपये अतिरिक्त डिस्काउंट देखील मिळेल. हा फोन २३,९९० रुपये सुरुवाती किंमतीत उपलब्ध आहे. फोनमध्ये ५००० एमएएचची दमदार बॅटरी, १२० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येणारा डिस्प्ले, क्वालकॉन स्नॅपड्रॅगन ७७८जी ५जी प्रोसेसर मिळतो.
IQOO 7

iQOO 7 स्मार्टफोनवर २ हजार रुपये कूपन, ३ हजार रुपये एक्सचेंज ऑफर आणि ३ हजार रुपये अतिरिक्त डिस्काउंट मिळत आहे. डिस्काउंटनंतर स्मार्टफोन २९,९९० रुपयांच्या सुरुवाती किंमतीत उपलब्ध आहे. आइकूच्या या फोनमध्ये ६.६२ इंच एमोलेड डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. यात पॉवरसाठी ६६ वॉट फ्लॅश चार्ज सपोर्टसह ४४०० एमएएचची दमदार बॅटरी मिळते. यात ४८ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा दिला आहे.
IQOO 7 Legand

iQOO 7 Legand या ५जी स्मार्टफोनवर ३ हजार रुपयांचे कूपन, ३ हजार रुपये एक्सचेंज ऑफर आणि ३ हजार रुपये अतिरिक्त सूट दिली जात आहे. डिस्काउंटनंतर या फोनला तुम्ही ३६,९९० रुपयांच्या सुरुवाती किंमतीत खरेदी करू शकता. स्मार्टफोनमध्ये ६.६२ इंच एमोलेड डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. यात ४८ मेगापिक्सल मुख्य कॅमेरा, ६६ वॉट फ्लॅश चार्ज टेक्नोलॉजीसह ४४०० एमएएचची बॅटरी मिळते.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times