भारतातील खासगी टेलिकॉम कंपन्या रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडियाने काही दिवसांपूर्वीच प्रीपेड प्लान्सच्या किंमती वाढवत ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. लवकरच, पोस्टपेड प्लान्सच्या किंमती देखील वाढण्याची शक्यता आहे. प्रीपेड प्लान्सचे दर बदलल्यानंतर आता यामध्ये मिळणाऱ्या बेनिफिट्समध्ये देखील कंपनीने बदल केला आहे. काही कंपन्यांनी आपल्या स्वस्त प्लान्समध्ये एसएमएस बेनिफिट्स देणे बंद केले आहे. तसेच, मोफत ओटीटी सबस्क्रिप्शन देखील बंद झाले आहे. जर तुम्हाला प्रीपेड प्लान्ससाठी अतिरिक्त पैसे खर्च करायचे नसल्यास तुम्ही ब्रॉडबँड प्लान्सचा पर्याय निवडू शकता. टेलिकॉम कंपन्या जिओ, एअरटेल आणि BSNL कडे काही चांगले ब्रॉडबँड प्लान्स आहेत. या प्लान्समध्ये तुम्हाला हाय-स्पीड डेटासह कॉलिंग आणि प्रीमियम अ‍ॅप्सचे सबस्क्रिप्शन मिळेल. जिओ, एअरटेल आणि BSNL च्या स्वस्त ब्रॉडबँड प्लान्समध्ये मिळणाऱ्या बेनिफिट्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

​Jio चा ३९९ रुपयांचा ब्रॉडबँड प्लान

जिओ-

जिओच्या ३९९ रुपयांच्या ब्रॉडबँड प्लानमध्ये यूजर्सला ३० एमबीपीएसच्या स्पीडने अनलिमिटेड डेटाची सुविधा मिळते. या प्लानमध्ये यूजर्सला मोफत अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली आहे. मात्र, यात ओटीटी अ‍ॅप्सचे सबस्क्रिप्शन मिळणार नाही.

Jio चा ६९९ रुपयांचा ब्रॉडबँड प्लान

जिओच्या ६९९ रुपयांच्या ब्रॉडबँड प्लानमध्ये यूजर्सला १०० एमबीपीएस स्पीडने अनलिमिटेड डेटा ऑफर केला जातो. यात यूजर्सला मोफत कॉलिंगची दखील सुविधा मिळते. तसेच, या ब्रॉडबँड प्लानमध्ये देखील कोणत्या ओटीटी अ‍ॅप्सचे सबस्क्रिप्शन दिले जात नाही.

​Airtel च्या ४९९ रुपयांचा ब्रॉडबँड प्लान

एअरटेल-

टेलिकॉम कंपनी Airtel चा हा बेसिक ब्रॉडबँड प्लान आहे. या प्लानची किंमत ४९९ रुपये असून, यामध्ये ग्राहकांना ४० एमबीपीएस च्या स्पीडने डेटा दिला जातो. तसेच, यूजर्स कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ घेऊ शकतात. Airtel च्या या ब्रॉडबँड प्लानमध्ये मिळणाऱ्या अतिरिक्त बेनिफिट्सबद्दल सांगायचे तर यामध्ये विंक म्यूझिक आणि एअरटेल डीटीएस बॉक्स १ महिन्याच्या एचडी पॅकसोबत दिला जाईल. या बेनिफिट्समुळे हा प्लान नक्कीच फायद्याचा ठरतो.

​Airtel च्या ७९९ रुपयांचा ब्रॉडबँड प्लान

एअरटेल-

टेलिकॉम कंपनी Airtel चा मिड रेंज ब्रॉडबँड प्लान आहे. या प्लानची किंमत फक्त ७९९ रुपये असून, यामध्ये यूजर्सला १०० एमबीपीएस च्या स्पीडने डेटाची सुविधा मिळते. एअरटेलच्या या प्लानमध्ये यूजर्सला कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची देखील सुविधा दिली जात आहे. ब्रॉडबँड प्लानमध्ये मिळणाऱ्या अन्य फायद्यांबद्दल सांगायचे तर यामध्ये विंक म्यूझिक आणि एअरटेल डीटीएस बॉक्स १ महिन्याच्या एचडी पॅकसोबत दिला जाईल. तुम्हाला जर प्रीपेड प्लान्ससाठी अतिरिक्त पैसे खर्च करायचे नसल्यास हा प्लान फायद्याचा ठरू शकतो.

​BSNL चा ४४९ रुपयांचा ब्रॉडबँड प्लान

bsnl-

BSNL चा ४४९ रुपयांचा हा भारत फायबर प्लान आहे. या प्लानमध्ये यूजर्सला ३० एमबीपीएस च्या स्पीडने एकूण ३.३ टीबी म्हणजेच ३३०० जीबी डेटा मिळतो. यूजर्सने वैधतेच्या आधीच संपूर्ण डेटा समाप्त केल्यास, स्पीड कमी होऊन २ एमबीपीएस वर येईल. BSNL च्या या ब्रॉडबँड प्लानमध्ये यूजर्सला अनलिमिटेड कॉलिंग आणि ओटीटी अ‍ॅप्सचे सबस्क्रिप्शन मात्र मिळत नाही. फक्त डेटा वापरणार असाल तर हा स्वस्त प्लान नक्कीच फायद्याचा ठरू शकतो.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here