भारतीय स्मार्टफोन मार्केटसाठी १५ हजारांचा सेगमेंट खूप महत्त्वाचा आहे, कारण हा सेगमेंट फोन व्हॉल्यूमच्या बाबतीत खूप लोकांना आकर्षित करतो. गेल्या काही वर्षांपासून, बहुतेक मोबाइल उत्पादकांनी या विभागात त्यांचे मोबाइल फोन उत्तम कॅमेरा, वेगवान प्रोसेसर आणि उत्तम बॅटरीच्या आधारे सादर केले आहेत. या रेंजमध्ये तुम्हाला अनेक स्मार्टफोन ब्रँड्सची अनेक उपकरणे मिळतील. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 प्रोसेसर, जो काही काळापूर्वी २०,००० रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या फोनमध्ये दिला जात होता, तो आता तुम्हाला १५ हजार रुपयांच्या खाली येणाऱ्या फोनमध्येही मिळेल. तसेच, १५,००० रुपयांच्या आत सेगमेंटमध्ये, आता तुम्हाला फोनमध्ये ४८ मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर देखील मिळतो. आज आम्ही तुम्हाला बाजारात सध्या १५,००० रुपयांच्या आत असलेल्या Best Mobile phones under 15000 सर्वोत्तम स्मार्टफोनबद्दल माहिती देत आहोत. जाणून घ्या सविस्तर .

रेडमी 10 प्राइम

redmi-10-prime

या फोनमध्ये ६.५ इंचाचा फुल एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले दिला आहे. हँडसेटमध्ये ४ जीबी रॅम प्लस ६ जीबी रॅम सोबत ६४ जीबी आणि १२८ जीबी स्टोरेज दिले आहे. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्ड द्वारे वाढवता येवू शकते. या फोनला पॉवर देण्यासाठी यात ६००० mAh ची बॅटरी दिली आहे. १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे.फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड, २ मेगापिक्सलचा मायक्रो आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिले आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ८ मेगापिक्सलचा फ्रंट सेन्सर दिले आहे.फोनची किंमत १२,४९९ रुपये आहे.

Redmi Note 10s

redmi-note-10s

Redmi Note 10S स्मार्टफोनमध्ये ६.४३ इंचाचा फुल इंचाचा फुल एचडी प्लस अमोलेड डिस्प्ले दिला आहे. डिस्प्ले टॉपवर कॉर्निंग गोरीला ग्लास ३ प्रोटेक्टेड दिले आहे. फोनमध्ये मीडियाटेक हेलियो G95 SoC दिला आहे. ज्यात ARM Mali G76 MC4 GPU दिले आहे. फोन IP53 रेटिंग दिले आहे. हे डस्ट आणि वॉटर रेजिस्टेंट आहे. हा कंपनीचा पहिला फोन आहे. जो MIUI १२.५ अँड्रॉयड ११ वर काम करतो. या फोनमध्ये ५,००० mAh ची बॅटरी दिली आहे. ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येते.फोनची किंमत १२,९९९ रुपये आहे.

Realme 8i

खरोखर-8i

Realme 8i या स्मार्टफोनमध्ये ६.६० इंच डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. फोन ऑक्टा कोर MediaTek Helio G९६ प्रोसेसरसह येतो. यात फ्रंटला १६ मेगापिक्सल आणि रियरला ५० + २ + २ मेगापिक्सल कॅमेरा दिला आहे. यात ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज दिले आहे. फोन १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची दमदार बॅटरी मिळते. फोन अँड्राइड ११ आधारित Realme UI २.० वर काम करतो. फोनची किंमत १३,६२९ रुपये आहे

सॅमसंग गॅलेक्सी F22

samsung-galaxy-f22

यात ६.४ इंचाचा एचडी + सुपर एमोलेड डिस्प्लेआहे, ज्याचा रफ्रेश दर ९० हर्ट्ज आणि १६००X ७२० पिक्सलचा स्क्रीन रिझोल्यूशन आहे. Android ११ OS च्या OneUI ३.१ च्या आधारे, हा फोन मीडियाटेक हेलिओ जी ८० एसओसी प्रोसेसरद्वारे समर्थित आहे. या फोनमध्ये ६,००० एमएएच बॅटरी आहे. जी १५ डब्ल्यू फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. सेल्फीसाठी या फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्याचे प्राथमिक सेन्सर ४८ मेगापिक्सल आहे. या फोनमध्ये ८ एमपी वाइड अँगल लेन्स, २ एमपी खोलीचे सेन्सर आणि २ एमपी मॅक्रो लेन्स देखील आहेत. फोनची किंमत १२,९९९ रुपये आहे.

Moto G 31

moto-g-31

Moto G31 स्मार्टफोनमध्ये ६.४ इंचाचा AMOLED फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे.हा फोन Android ११ आधारित ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल. Moto G31 स्मार्टफोनच्या मागील पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात Primary कॅमेरा म्हणून ५० MP सेन्सर आहे. याशिवाय ८ MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा, २ MP डेप्थ कॅमेरा कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फोनच्या समोर १३ MP कॅमेरा देण्यात आला आहे. Moto G31 स्मार्टफोनमध्ये पॉवर बॅकअपसाठी फोनमध्ये ५००० mAh बॅटरी उपलब्ध असेलरी लाईफ देतो. फोनची किंमत १२,९९९ रुपये आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here