ऑनलाइन शॉपिंग साइट Flipkart च्या Big Saving Days 2021 सेलला आजपासून (१६ डिसेंबर) सुरुवात झाली आहे. प्लिपकार्टचा हा सेल २१ डिसेंबरपर्यंत चालेल. या सेलमध्ये ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून ते कपड्यांपर्यंत अनेक वस्तू स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. तुम्ही जर नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तर Flipkart Big Saving Days सेल तुमच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो. या सेलमध्ये ग्राहकांना Xiaomi, Vivo, POCO, Realme आणि Apple सारख्या कंपन्यांच्या डिव्हाइसवर बंपर डिस्काउंटचा फायदा मिळेल. तसेच स्मार्टफोन्सवर कॅशबॅक ऑफरचा देखील फायदा मिळतो. फोनला एक्सचेंज ऑफर आणि नो-कॉस्ट ईएमआयवर देखील खरेदी करू शकता. या सेलमध्ये POCO M3 Pro 5G, OPPO F17 Pro, realme 8s 5G आणि iPhone 12 सारखे स्मार्टफोन्स स्वस्तात उपलब्ध आहेत. या फोन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

POCO M3 Pro 5G

poco-m3-pro-5g

POCO M3 Pro 5G स्मार्टफोन सेलमध्ये १४,४९९ रुपये किंमतीत लिस्ट आहे. या फोनच्या खरेदीवर १,५०० रुपयांपर्यंत सूट, एसबीआयकडून १० टक्के डिस्काउंट आणि अ‍ॅक्सिस बँकेकडून ५ टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळेल. सोबतच, फोनवर १३,९०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा देखील लाभ मिळतो. या फोनला तुम्ही दरमहिना ५०३ रुपये देऊन नो-कॉस्ट ईएमआयवर खरेदी करू शकता. फोनमध्ये ६.५ इंच डिस्प्ले, ४८ मेगापिक्सल कॅमेरा आणि ५००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे.

OPPO F17 Pro

oppo-f17-pro

OPPO F17 Pro स्मार्टफोनला तुम्ही १९,९९० रुपयात खरेदी करू शकता. या डिव्हाइसवर ६ हजार रुपये डिस्काउंट, एसबीआयकडून १० टक्के डिस्काउंट दिले जात आहे. ग्राहक या फोनला नो-कॉस्ट ईएमआयवर देखील खरेदी करू शकतील. OPPO F17 Pro फोनमध्ये ६.४३ इंच एचडी डिस्प्ले, ४८ मेगापिक्सल मुख्य कॅमेऱ्यासह क्वाड रियर कॅमेरा सेटअप, पॉवरसाठी ४०१५ एमएएचची दमदार बॅटरी आणि मीडियाटेक हीलियो पी९५ चिपसेटचा सपोर्ट मिळतो.

realme 8s 5G

realme-8s-5g

realme 8s 5G स्मार्टफोन फ्लिपकार्ट सेलमध्ये १९,९९९ रुपये किंमतीत उपलब्ध आहे. या डिव्हाइसवर २ हजार रुपये डिस्काउंट दिले जात आहे. या फोनवर फ्लिपकार्ट पे लेटर स्कीम अंतर्गत १०० रुपये सूट, एसबीआयकडून १० टक्के डिस्काउंट दिले जात आहे. तसेच, एक्सचेंज ऑफर आणि ईएमआयवर खरेदी करू शकता. फोनमध्ये ६.५ इंच फुल एचडी स्क्रीन दिली आहे. यात ६४ मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, ५००० एमएएचची बॅटरी आणि मीडियाटेकचा ५जी प्रोसेसर मिळतो.

आयफोन १२

आयफोन-12

तुम्ही जर iPhone खरेदी करण्याचा विचार करत असाल तर फ्लिपकार्ट सेल फायद्याचा ठरू शकतो. फ्लिपकार्ट सेलमध्ये आयफोन १२ हा ५४,१९९ रुपये किंमतीत उपलब्ध आहे. या स्मार्टफोनवर एसबीआयकडून १० टक्के डिस्काउंट दिले जात आहे. डिव्हाइसवर ५ टक्के कॅशबॅक आणि १५,४५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळेल. तसेच, २,२२९ रुपयांच्या नो-कॉस्ट ईएमआयवर देखील फोन खरेदी करता येईल. आयफोन १२ मध्ये रेटिना डिस्प्ले, ए१४ बायोनिक चिपसेट, १२ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आणि १२ मेगापिक्सल ड्यूल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here