Blaupunkt 55-इंच 4K Android TV

ई-कॉमर्स साइट Flipkart वरून या टीव्हीला ४०,९९९ रुपयात खरेदी करू शकता. यामध्ये ५५ इंच स्क्रीन दिली असून, याद्वारे क्रिस्टल क्लिअर पिक्चर क्वालिटी आणि रिच साउंड मिळते. कलर्स आणि शार्प व्हिज्यूअलसाठी यात एचडीआर१०+ चा सपोर्ट दिला आहे. Blaupunkt चा हा स्मार्ट टीव्ही अँड्राइड ऑपरेटिंग सिस्टमवर काम करते. या टीव्हीमध्ये Google Play Store द्वारे वेगवेगळ्या गेम्स आणि अॅप्सला डाउनलोड करू शकता. टीव्हीच्या रिमोटमध्ये गुगल असिस्टेंटचा सपोर्ट दिला आहे.
Westinghouse UHD 55-इंच टीव्ही

ई-कॉमर्स साइट Amazon वरून या टीव्हीला ३२,९९९ रुपयात खरेदी करू शकता. या टीव्हीमध्ये ५५ इंच स्क्रीन दिली असून, जी अल्ट्रा थिन बेझलने सुसज्ज आहे.हा टीव्ही अँड्राइड ९ वर काम करतो. यात ४० वॉट स्पीकर आउटपूट, एचडीआर१०, २ जीबी रॅम, सराउंड साउंड टेक्नोलॉजी, ५०० निट्स ब्राइटनेस आणि २ स्पीकर दिले आहेत. यात इन बिल्ट क्रोमकास्टचा सपोर्ट दिला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी अनेक फीचर्स दिले आहेत.
Mi 55 इंच 4K अल्ट्रा HD Android स्मार्ट एलईडी टीव्ही 4X

Mi च्या या स्मार्ट टीव्हीला तुम्ही Amazon वरून ४४,९९९ रुपयात खरेदी करू शकता. या स्मार्ट टीव्हीमध्ये ५५ इंच स्क्रीन दिली असून, याचे रिझॉल्यूशन ३८४०x२१६० पिक्सल आहे. स्मार्ट टीव्हीमध्ये एचडीआरचा सपोर्ट दिला आहे, यामुळे शानदार ब्राइटनेस, कलर्स आणि कंट्रॅस्ट मिळतो. Mi TV 4X मध्ये डॉल्बी साउंड देखील मिळतो. Mi 4K Ultra HD Android Smart LED TV 4X मध्ये वेगवेगळ्या अॅप्सचा देखील सपोर्ट दिला आहे.
LG 139.7 55 इंच 4K अल्ट्रा HD स्मार्ट एलईडी टीव्ही 55UP7500PTZ

LG च्या या स्मार्ट टीव्हीला तुम्ही ५१,९९० रुपयात खरेदी करू शकता. फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल सांगायचे तर या स्मार्ट टीव्हीमध्ये ५५ इंच स्क्रीन दिली असून, याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. यामध्ये WebOS स्मार्ट टीव्ही, AI ThinQ, बिल्ट इन गूगल असिस्टेंट आणि Alexa, अॅपल एअरप्ले २ आणि होम किट, अनलिमिटेड ओटीटी अॅप्स सपोर्ट जसे की Netflix, Prime Video, Disney+Hotstar, Apple TV, SonyLIV, Discovery+, Zee5, Voot, Google Play Movies & TV, YuppTV आणि YouTube चा अॅक्सेस मिळतो.
Acer 55 इंच अमर्याद मालिका 4K अल्ट्रा HD Android स्मार्ट एलईडी टीव्ही AR55AP2851UDF

Acer च्या या ५५ इंच स्मार्ट टीव्हीची किंमत ३४,९९९ रुपये आहे. ५५ इंच डिस्प्लेसह येणाऱ्या या स्मार्ट टीव्हीमध्ये २४ वॉट स्पीकर दिले असून, हे Dolby Audio आणि Pure Sound २ ला सपोर्ट करतात. टीव्हीमध्ये ६४ bit Quad-Core प्रोसेसर दिला आहे. स्टोरेजबद्दल सांगायचे तर Acer च्या या टीव्हीत २ जीबी रॅम आणि १६ जीबी स्टोरेज मिळते. टीव्हीमध्ये तुम्हाला वेगवेगळी ओटीटी अॅप्सचा देखील अॅक्सेस मिळतो.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times