हायलाइट्स:

  • OnePlus Buds Z2 लाँच.
  • इयरबड्समध्ये मिळते ३८ तासांची बॅटरी लाइफ.
  • व्हाइट कलर व्हेरिएंटमध्ये येतात इयरबड्स.


नवी दिल्ली : वनप्लस ने आपले बजेट ट्रू वायरलेस इयरफोन OnePlus Buds Z2 ला अखेर लाँच केले आहे. नवीन Buds Z2 इअरबड्स हे OnePlus Buds Z चे सक्सेसर आहे. दोन्हींचे डिझाइन समानच आहे. नवीन इयरबड्समध्ये ANC फीचर दिले आहे.

वाचा: JioFiber: जिओचा भन्नाट प्लान, ३००Mbps इंटरनेट स्पीडसह मिळेल १६ ओटीटी अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन

कंपनीने इयरबड्सला एकाच पांढऱ्या कलर व्हेरिएंटमध्ये लाँच केले आहे. काळ्या रंगातील व्हेरिएंट पुढील वर्षीच्या सुरुवातीला लाँच होऊ शकते. यामध्ये ११ एमएम डायनॅमिक ड्रायव्हर दिले आहेत.

OnePlus Buds Z2फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

OnePlus Buds Z2 च्या प्रत्येक बड्समध्ये ४० एमएएचची बॅटरी दिली आहे. तर केसमध्ये ५२०एमएएचची बॅटरी मिळते. याद्वारे ३८ तासांची बॅटरी लाइफ मिळते. तसेच, एएनएसी फीचर बंद ठेवल्यास इयरबड्स ७ तास वापरू शकता.

OnePlus Buds Z2 फ्लॅश चार्ज टेक्नोलॉजीसह येते. बड्सला १० मिनिटांच्या चार्जमध्ये ५ तास वापरू शकता. यामध्ये ९४ एमएस लो लेटेंसी, ब्लूटूथ ५.२, डॉल्बी एटमॉस सपोर्ट आणि कॉलदरम्यान ऑडओ रिस्पेशनसाठी तीन-माइक्रोफोन सेटअप दिला आहे.

पाणी आणि घामापासून सुरक्षेसाठी बड्सला आयपी५५ आणि केसला आयपीएक्स४ रेटिंग मिळाले आहे.यात Google Fast Pair देखील आहे व बॉक्समध्ये तीन साइजचे इयरटिप्स मिळतात.

OnePlus Buds Z2 ची किंमत

OnePlus Buds Z2 ला अमेरिका, कॅनडा आणि यूरोपमध्ये लाँच केले आहे. याची किंमत ९९ डॉलर्स (जवळपास ७,५४६ रुपये) आहे. या इयरबड्सला लवकरच oneplus आरटीसह भारतात लाँच केले जाईल, तेव्हाच डिव्हाइसची भारतातील किंमत स्पष्ट होईल.

वाचा: Laptop Cleaning Tips: लॅपटॉप क्लिन करतांना ‘या’ चुका टाळाच, नाही तर होणार हजारोंचे नुकसान, पाहा डिटेल्स

वाचा: OnePlus: OnePlus 10 Pro मध्ये मिळतील ‘हे’ दमदार फीचर्स, ८० W फास्ट चार्जिंगचा सपोर्टही मिळणार, पाहा डिटेल्स

वाचा: Keyboard Apps : हे कीबोर्ड Apps, फास्ट टायपिंगसह टायपो एररकडे देखील देतात लक्ष, पाहा डिटेल्स

OnePlus Buds Z2

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here