काही दिवसांपूर्वीच टेलिकॉम कंपन्या Jio, Airtel आणि Vodafone-Idea ने आपल्या प्रीपेड प्लान्सच्या किंमती वाढवल्या आहेत. अशात ग्राहक स्वस्त रिचार्ज प्लान्स शोधत आहे. तुम्ही जर दर महिन्याला रिचार्ज करून वैतागला असाल तर टेलिकॉम कंपन्यांकडे वर्षभराच्या वैधतेसह येणारे काही चांगले प्लान्स उपलब्ध आहे. Jio, Airtel आणि Vodafone-Idea सह BSNL कडे देखील ३६५ दिवसांच्या वैधतेसह येणारा प्लान आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना डेटा, कॉलिंग आणि एसएमएस बेनिफिट्सची सुविधा मिळते. इतर कंपन्यांच्या तुलनेत BSNL चा प्लान स्वस्त आहे. BSNL च्या वर्षभराच्या वैधतेसह येणाऱ्या प्लानची किंमत फक्त १,९९९ रुपये आहे. तर इतर कंपन्यांच्या प्लान्सची किंमत २ हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. या प्लान्समध्ये ग्राहकांना दररोज १.५ जीबी ते २ जीबी डेटाचा फायदा मिळतो. तसेच, अनलिमिटेड कॉलिंगची देखील सुविधा मिळते.

​BSNL चा ३६५ दिवसांचा प्लान

bsnl-

BSNL च्या लाँग टर्म प्लानची किंमत १,९९९ रुपये आहे. या प्लानची वैधता ३६५ दिवस म्हणजेच एक वर्षाची असून, यामध्ये ग्राहकांना एकूण ६०० जीबी इंटरनेट डेटा मिळतो. हा इंटरनेट डेटा समाप्त झाल्यानंतर यूजर्सला ८० KBPS च्या स्पीडने इंटरनेट डेटाचा फायदा मिळेल. तसेच, बीएसएनएलच्या या प्लानमध्ये यूजर्सला अनलिमिटेड वॉइस कॉल आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा दिली जात आहे. याशिवाय यूजर्सला अनलिमिटेड साँग चेंज पर्यायासह मोफत पीआरबीटी, ६० दिवसांसाठी Lokdhun Content आणि ३६५ दिवसांसाठी EROS Now चे सबस्क्रिप्शन मिळते.

​Jio चा ३३६ दिवसांच्या वैधतेसह येणारा प्लान

जिओ-

रिलायन्स जिओच्या या लाँग टर्म प्लानची किंमत २,५४५ रुपये आहे. या प्लानची वैधता ३३६ दिवस असून, यात दररोज १.५ जीबी इंटरनेट डेटा मिळतो. डेली डेटा लिमिट समाप्त झाल्यानंतर यूजर्सला ६४ kbps च्या स्पीडने इंटरनेट डेटा मिळेल. Jio च्या या प्लानमध्ये यूजर्सला एकूण ५०४ जीबी इंटरनेट डेटा दिला आहे. प्लानमध्ये दररोज १०० एसएमएस आणि अनलिमिटेड डेटाची सुविधा मिळते. तसेच, जिओ अ‍ॅप्सचा देखील अ‍ॅक्सेस मिळतो.

​Airtel चा ३६५ दिवसांचा प्लान

एअरटेल-

Airtel च्या लाँग टर्म प्लानची किंमत २,९९९ रुपये आहे. या प्लानची वैधता देखील ३६५ दिवस असून, यामध्ये ग्राहकांना दररोज २ जीबी डेटाचा लाभ मिळतो. याशिवाय या प्लानमध्ये दररोज १०० एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. प्लानमध्ये मिळणाऱ्या अन्य फायद्यांबद्दल सांगायचे तर यात ३० दिवसांसाठी अ‍ॅमेझॉन प्राइमचे ट्रायल सबस्क्रिप्शन, ३ महिन्यांसाठी Apollo २४/७ Circle, Shaw Academy चा मोफत ऑनलाइन कोर्स, फास्टँगवर १०० रुपये कॅशबॅक, फ्री हॅलोट्यून्स आणि विंक म्यूझिकचे सबस्क्रिप्शन मिळते.

​Vi चा ३६५ दिवसांचा प्लान

आम्ही-

वोडाफोन आयडियाच्या या लाँग टर्म प्लानची वैधता २,८९९ रुपये आहे. या प्लानची एकूण वैधता ३६५ दिवस म्हणजेच एक वर्ष आहे. प्लानमध्ये ग्राहकांना दररोज १.५ जीबी डेटा दिला जात आहे. तसेच, दररोज १०० एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. Vi च्या प्लानमध्ये मिळणाऱ्या अन्य फायद्यांबद्दल सांगायचे तर यात विकेंड डेटा रोलओव्हर, डेटा डिलाइट्स, बिंज ऑल नाइट आणि Vi Movies and TV Classic चे सबस्क्रिप्शन मिळते.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here