भारतीय स्मार्टफोन बाजाराचा वेगाने विस्तार होत आहे. अनेक कंपन्या बाजारात एकापेक्षा एक शानदार हँडसेट लाँच करत आहेत. २०२१ वर्षात देखील भारतीय बाजारात वेगवेगळ्या प्राइस रेंजमध्ये दमदार फीचर्ससह येणारे शानदार स्मार्टफोन लाँच झाले आहेत. बाजारात १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत शानदार स्मार्टफोन्स लाँच झाले आहेत. बाजारात या स्मार्टफोन्सला सर्वाधिक मागणी पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या फोनमध्ये शानदार डिस्प्ले, पॉवरफुल प्रोसेसर, कॅमेरा आणि दमदार बॅटरी मिळते. १० हजार रुपयांच्या बजेटमध्ये Samsung Galaxy F02s, Infinix Hot 11S, Moto E7 Plus, Nokia C20 Plus आणि Realme Narzo 30A स्मार्टफोन उपलब्ध आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने तुम्ही स्वतःसाठी अथवा इतरांना गिफ्ट देण्यासाठी फोन शोधत असाल तर हे डिव्हाइस नक्कीच एक चांगला पर्याय ठरेल. या फोन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Samsung Galaxy F02s

samsung-galaxy-f02s

Samsung Galaxy F02s स्मार्टफोनमध्ये ६.५ इंच PLS IPS डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन ७२०x१६०० पिक्सल आहे. यात ऑक्टा कोर Qualcomm SDM४५० प्रोसेसरचा सपोर्ट दिला आहे. पॉवरसाठी यात १५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची बॅटरी मिळते. यात रियरला १३ + २ + २ मेगापिक्सल आणि फ्रंटला ५ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. Samsung Galaxy F02s फोनच्या ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटला ९,४९९ रुपयात खरेदी करू शकता.

Infinix Hot 11S

infinix-hot-11s

Infinix Hot 11S स्मार्टफोनमध्ये ६.७८ इंच IPS LCD डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज आणि रिझॉल्यूशन १०८०x२४८० पिक्सल आहे. यात ऑक्टा कोर MediaTek Helio G८८ प्रोसेसर दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये फ्रंटला ८ मेगापिक्सल आणि रियरला ५० + २ + एआय लेंस दिली आहे. पॉवरसाठी यात ५००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. फोनच्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १०,४९९ रुपये आहे.

Moto E7 Plus

moto-e7-plus

Moto E7 Plus स्मार्टफोनमध्ये ६.५० इंच IPS LCD डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन ७२०x१६०० पिक्सल आहे. फोन ऑक्टा कोर Qualcomm Snapdragon ४६० प्रोसेसरसह येतो. यात रियरला ४८ + २ मेगापिक्सल आणि फ्रंटला ८ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा मिळतो. पॉवरसाठी १० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची दमदार बॅटरी मिळते. Motorola Moto E7 Plus च्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ८,९९९ रुपये आहे.

नोकिया सी२० प्लस

nokia-c20-plus

Nokia C20 Plus स्मार्टफोनमध्ये ६.५० इंच IPS LCD डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन ७२०x१६०० पिक्सल आहे. यात ऑक्टा कोर Unisoc SC९६८३A प्रोसेसर दिला आहे. फोटोग्राफीसाठी यात रियरला ८ + २ मेगापिक्सल आणि फ्रंटला ५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. पॉवरसाठी यात ४९५० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. Nokia C20 Plus स्मार्टफोनच्या २ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ८,९९९ रुपये आहे.

Realme Narzo 30A

realme-narzo-30a

Realme च्या या स्मार्टफोनमध्ये ६.५० इंच IPS LCD डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन ७२०x१६०० पिक्सल आणि आस्पेक्ट रेशियो २०:९ आहे. फोनमध्ये ऑक्टा कोर MediaTek Helio G८५ चिपसेटचा सपोर्ट दिला आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये १३ मेगापिक्सल प्रायमरी आणि २ मेगापिक्सल सेकेंडरी कॅमेरा दिला आहे. पॉवरसाठी यात १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ६००० एमएएचची दमदार बॅटरी मिळते. फोनच्या ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ८,९९९ रुपये आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here