जगभरातील सुमारे एक अब्ज लोक त्यांच्या मित्र आणि कुटुंबापर्यंत पोहोचण्यासाठी WhatsApp वापरतात.जगात प्रत्येक सातपैकी एक व्यक्ती त्यांच्या मित्र आणि कुटुंबियांच्या संपर्कात राहण्यासाठी WhatsApp चा वापर करतात. व्हॉट्स अॅप आज जवळपास सर्वच युजर्सच्या मोबाईलवर आहे. व्हॉट्सअॅपची अपडेट नोटिफिकेशन नियमित येते आणि तुम्हीही अपडेट करता. पण, या सगळ्या अपडेट्समध्ये तुम्हाला काय नवीन मिळतंय हे माहीत आहे का? जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही व्हॉट्सअॅपचे अनेक फीचर्स मिस करत आहात. आज आम्ही तुम्हाला व्हॉट्सअॅपच्या अशा फीचर्सची माहिती देणार आहोत जे २०२१ मध्ये कंपनीने ग्राहकांचा अनुभव अधिक चांगला करण्याच्या दृष्टीने जोडले.व्हॉट्सअॅप सतत नवनवीन फीचर्स आणत आहे, ज्यामुळे यूजर्समध्ये त्याची लोकप्रियता अधिकच वाढत आहे. व्हॉट्सअॅपची खासियत म्हणजे त्यात अनेक फीचर्स आहेत, जे यूजर्सच्या गोपनीयतेच्या दृष्टीने खूप उपयुक्त आहेत.

चॅट ट्रान्सफर

गप्पा-हस्तांतरण

जेव्हा लोकांना एका ऑपरेटिंग सिस्टमवरून दुसर्‍या ऑपरेटिंग सिस्टमवर स्विच करावे लागायचे , तेव्हा लोकांना व्हॉट्सअॅप चॅट्स ट्रान्सफर करण्यात खूप अडचणी येत होत्या. आता व्हॉट्सअॅपने जुन्या चॅट्स आयफोनवरून अँड्रॉइडवर आणि अँड्रॉइडवरून आयफोनवर ट्रान्सफर करण्याची सुविधा सुरू केली आहे. युजर्सना लाइटनिंग केबल किंवा यूएसबी टाइप-सी पोर्ट न वापरता चॅट ट्रान्सफर करण्याची परवानगी दिली जाईल. हे फीचर काही ठराविक फोनवरच उपलब्ध आहे, मात्र व्हॉट्सअॅप लवकरच सर्व स्मार्टफोनवर उपलब्ध होणार आहे.

व्हॉट्सअॅप मल्टी डिव्हाइस सपोर्ट

whatsapp-मल्टी-डिव्हाइस-सपोर्ट

बऱ्याच दिवसांपासून व्हॉट्सअॅप मल्टी-डिव्हाइस सपोर्ट फीचरवर काम करत असल्याची माहिती होती. व्हॉट्सअॅप हे फीचर लॉन्च करणार असल्याचं अनेकदा ऐकलं होतं, पण अनेक कारणांमुळे हे फीचर जारी होण्यास उशीर झाला. शेवटी, २०२१ मध्ये, मल्टी-डिव्हाइस वैशिष्ट्य केवळ बीटा स्वरूपात युजर्ससाठी सादर केले गेले. युजर्स आता एकाच वेळी त्यांच्या संगणक, टॅबलेट आणि स्मार्टफोनवर व्हॉट्सअॅपवर लॉग इन राहू शकतात. या फीचरचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे व्हॉट्सअॅपवर लॉग इन करण्यासाठी युजर्सना त्यांच्या स्मार्टफोनमध्ये इंटरनेट सक्रिय असण्याची गरज नाही.

अदृश्य संदेश

अदृश्य-संदेश

हे फीचर २०२१ मध्ये देखील लाँच करण्यात आले आहे. हे फिचर स्नॅपचॅट आणि इंस्टाग्राममध्ये आधीपासून होते आणि त्यानंतर ते व्हॉट्सअॅपमध्ये जोडले गेले आहे. या फीचरच्या मदतीने युजर्स मेसेज पाठवू शकतात. आणि ठराविक वेळेनंतर पाठवलेला मेसेज आपोआप डिलीट होतो.

WhatsApp वेब: ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंग वैशिष्ट्य

व्हॉट्सअॅपच्या वेब व्हर्जनला अनेक मनोरंजक अपडेट्स प्राप्त झाले आहेत, कंपनीने त्याच्या वेब आवृत्तीवर व्हिडिओ आणि ऑडिओ कॉलिंग सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यापूर्वी ही सुविधा फक्त मोबाईल अॅपवर उपलब्ध होती. यासोबतच यूजर्स फोटो व्हॉट्सअॅप वेबवर पाठवण्यापूर्वी एडिट करू शकतात.

व्हॉइस मेसेज पूर्वावलोकन

आवाज-संदेश-पूर्वावलोकन

यात युजर्स त्यांचे व्हॉइस मेसेज पाठवण्यापूर्वी ते प्ले करू शकतात, थांबवू शकतात आणि ऐकू शकतात. यापूर्वी, युजर्सना पुन्हा व्हॉईस मेसेज प्ले करण्याचा पर्याय नव्हता. आता नवीन फीचरमुळे वॉइस मेसेज पाठवण्याआधी यूजर्सला ऐकता येणार आहे. यासाठी तुम्हाला WhatsApp वर एखादा व्यक्ती किंवा ग्रुप चॅट ओपन करावे लागेल. चॅट ओपन केल्यानंतर मायक्रोफोनवर टच करा आणि स्लाइड अप करून हँड्स-फ्री रेकॉर्डिंगला लॉक करा. त्यानंतर तुम्ही वॉइस रेकॉर्ड करू शकता. बोलणे पूर्ण झाल्यानंतर स्टॉपवर टॅप करा. आता तुम्ही प्लेवर टॅप करून रेकॉर्डिंग करू शकता.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here