Samsung Galaxy Z Fold 3

Samsung Galaxy Z Fold 3 आणि Samsung Galaxy Z Flip 3 हे या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेले फोन आहेत. यापैकी, फ्लिप सीरिजची सुरुवातीची किंमत ८४,९९९ रुपये आहे, तर फोल्ड सीरिजची सुरुवातीची किंमत १,४९,९९९ रुपये आहे. Samsung Galaxy Z Fold 3 आणि Samsung Galaxy Z Flip 3 हे दोन्ही फोन स्ट्रेचेबल PET5 पासून बनवलेल्या संरक्षक फिल्मसह येतात. याशिवाय या दोन्ही फोनला वॉटर रेसिस्टंटसाठी IPX8 रेटिंग मिळाली आहे.
Oppo Find N

Oppo Find N हा Oppo चा पहिला फोल्डेबल आणि वर्षातील सर्वात मोठा फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे. Oppo Find N सध्या चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. या फोनबद्दल असा दावा केला जात आहे की, Oppo Find N च्या दोन्ही बाजूंमध्ये कोणतेही अंतर नाही. Oppo Find N च्या८ GB रॅम आणि २५६ GB स्टोरेजची किंमत ७,६९९ चीनी युआन म्हणजे सुमारे ९२,१०० रुपये आहे. १२ GB रॅम सह ५१२ GB स्टोरेजची किंमत ८,९९ चीनी युआन म्हणजे सुमारे १,०७,६०० रुपये आहे.
Mi 11 अल्ट्रा

Mi 11 Ultra : Xiaomi ने या वर्षी एप्रिलमध्ये Mi 11 Ultra भारतात लाँच केला होता. Mi 11 Ultra हा Xiaomi चा आतापर्यंत भारतात लाँच होणारा सर्वात महागडा स्मार्टफोन आहे, जरी आता कंपनीने Mi 11 Ultra ची भारतीय बाजारपेठेसाठी विक्री थांबवली आहे. Mi 11 Ultra च्या सेगमेंटमध्ये Apple आणि Samsung सारख्या कंपन्यांचे फ्लॅगशिप स्मार्टफोन आहेत. Mi 11 Ultra भारतात ६९,९९० रुपयांना लाँच करण्यात आला.
Oneplus 9RT

OnePlus 9RT मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपसह १२० Hz रिफ्रेश रेटसह AMOLED डिस्प्ले आहे. OnePlus 9RT मध्ये Android 11 आधारित ColorOS देण्यात आला आहे. याशिवाय, यात ६.६२ -इंचाचा फुल एचडी प्लस Samsung E4 AMOLED डिस्प्ले देखील देण्यात आला आहे, ज्याचे रिझोल्यूशन १०८०x२४०० पिक्सेल आहे.
Samsung Galaxy S21 Ultra:
सॅमसंगने यावर्षी प्रीमियम श्रेणीमध्ये Samsung Galaxy S21 Series सादर केली आहे. यामध्ये सर्वात प्रीमियम फोन Galaxy S21 Ultra आहे. हे डिव्हाइस ६.८ इंच AMOLED डिस्प्ले आणि १५०० nits ब्राइटनेससह सादर केले गेले आहे. यासोबत १०० X झूम आणि 8K व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी सपोर्ट देण्यात आला आहे.
आयफोन 13

Apple iPhone 13 : या वर्षातील सर्वात मोठी फ्लॅगशिप series iPhone 13 आहे. iPhone 13 सीरीज अंतर्गत चार फोन लाँच करण्यात आले आहेत, ज्यात iPhone 13 Mini , iPhone 13 Min, iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max यांचा समावेश आहे. iPhone 13 मालिका A15 Bionic प्रोसेसरसह सादर करण्यात आली आहे. आयफोन 13 सीरीजमध्ये पहिल्यांदाच सिनेमटिक मोड आणि मॅक्रो मोड देण्यात आला आहे. आयफोन सीरिज अनेक स्मार्टफोन युजर्सची आवडती सीरिज आहे.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times