करोना व्हायरस महामारीमुळे सुरू झालेले वर्क फ्रॉम होम अद्याप सुरूच आहे. याशिवाय कॉलेज, शाळांचे क्लासेस देखील ऑनलाइन सुरू आहेत. त्यामुळे नेहमीपेक्षा जास्त इंटरनेटची गरज भासते. तुम्ही जर दररोज जास्त डेटा ऑफर करणारे प्लान शोधत असाल तर कमी किंमतीत काही चांगले प्रीपेड प्लान्स उपलब्ध आहेत. टेलिकॉम कंपन्या Airtel, Vodafone Idea आणि Reliance Jio ने काही दिवसांपूर्वी आपल्या प्रीपेड प्लान्सच्या किंमती वाढवल्या आहेत. त्यामुळे प्लानमध्ये मिळणारे बेनिफिट्स देखील बदलले आहेत. तुम्हाला जर दररोज जास्त डेटा लागत असल्यास या तिन्ही कंपन्यांकडे दररोज २ जीबी डेटासह येणारे काही चांगले प्लान्स उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे या प्लान्सची किंमत देखील कमी आहे. या प्लान्समध्ये तुम्हाला डेटासह अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएसची देखील सुविधा मिळेल. याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

​Airtel चा ८३९ रुपयांचा प्रीपेड प्लान

एअरटेल-

Airtel च्या ८३९ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस मिळतात. Airtel च्या या प्लानची वैधता ८४ दिवस आहे. प्लानमध्ये मिळणाऱ्या अन्य फायद्यांबद्दल सांगायचे तर यात Amazon Prime Mobile Edition, Free Online Course, FASTag वर 100 रुपये कॅशबॅक, Apollo २४|७ चे 3 महिन्यांचे सब्सक्रिप्शन, Free Hello Tunes आणि Wynk Music Free चा समावेश आहे.

​Airtel चा ५४९ रुपयांचा प्रीपेड प्लान

एअरटेल-

Airtel च्या ५४९ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. प्लानमध्ये ५६ दिवसांसाठी Amazon Prime Mobile Edition, Free Online Course, FASTag वर 100 रुपये कॅशबॅक, Apollo २४|७ चे 3 महिन्यांचे सब्सक्रिप्शन, Free Hello Tunes आणि Wynk Music Free मिळेल.

Reliance Jio चा २४९ रुपयांचा प्रीपेड प्लान

जिओच्या या प्लानची वैधता २३ दिवस असून, यामध्ये दररोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. या प्लानमध्ये JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud सारख्या अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जात आहे.

​Reliance Jio ७९९ रुपयांचा प्रीपेड प्लान

reliance-jio-

Reliance Jio च्या या प्लानमध्ये ५६ दिवसांसाठी दररोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. प्लानमध्ये १ वर्षासाठी Disney+ Hotstar Mobile चे मोफत सबस्क्रिप्शन, तसेच JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud सारख्या अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस मिळेल.

Reliance Jio च्या २९९ रुपये, ५३३ रुपये, ७१९ रुपये, १,०६६ रुपये, २,८७९ रुपये आणि ३,११९ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये देखील दररोज २ जीबी डेटा मिळतो.

​Vodafone Idea चा ५३९ रुपयांचा प्रीपेड प्लान

व्होडाफोन-आयडिया-

Vodafone Idea च्या ५३९ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये यूजर्सला दररोज २ जीबी डेटा दिला जात आहे. याशिवाय प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. Vodafone Idea च्या या प्लानची वैधता ५६ दिवस आहे. प्लानमध्ये मिळणाऱ्या अन्य फायद्यांबद्दल सांगायचे तर यात बिंज ऑल नाइट डेटा, विकेंड डेटा रोलओव्हर आणि Vi Movies & TV Classic चा अ‍ॅक्सेस मिळतो.

​Vodafone Idea चा ८३९ रुपयांचा प्रीपेड प्लान

व्होडाफोन-आयडिया-

Vodafone Idea च्या ८३९ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये यूजर्सला दररोज २ जीबी डेटाची सुविधा मिळते. प्लानमध्ये यूजर्सला सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस मिळतात. वीआयच्या या प्लानची वैधता ८४ दिवस आहे. प्लानमध्ये मिळणाऱ्या अन्य फायद्यांबद्दल सांगायचे तर यात बिंज ऑल नाइट डेटा, विकेंड डेटा रोल ओव्हर आणि Vi Movies & TV Classic चा अ‍ॅक्सेस मिळतो.

याशिवाय कंपनीच्या १७९ रुपये आणि ३५९ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा दिला जात आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here