भारतीय बाजारात गेल्या काही वर्षांमध्ये नियमित टीव्हींपेक्षा स्मार्ट टीव्हींना मोठ्या प्रमाणात मागणी पाहायला मिळत आहे. नियमित टीव्हींप्रमाणे स्मार्ट टीव्हींची किंमत देखील कमी असल्याने ग्राहकांकडून पसंती मिळत आहे. तुमचा घरातील जुना टीव्ही खराब झाला असेल अथवा नवीन वर्षाच्या निमित्ताने नवीन Smart TV घरी आणण्याचा विचार करत असाल तर ही चांगली संधी आहे. वर्षाच्या शेवटी अनेक कंपन्या आपल्या प्रीमियम 4K Ultra HD स्मार्ट टीव्हीवर शानदार ऑफर देत आहे. विशेष म्हणजे तुम्हाला या प्रीमियम स्मार्ट टीव्हींवर १.३० लाख रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळेल. ५५ इंच स्क्रीन साइजमध्ये TCL, Sony Bravia, LG आणि Samsung चे काही शानदार Smart TV उपलब्ध आहेत. या स्मार्ट टीव्हीमध्ये वॉइस असिस्टेंट, अ‍ॅप्स सपोर्टसह अनेक फीचर्स मिळतील. या टीव्हींविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Sony Bravia 55 इंच 4K अल्ट्रा HD स्मार्ट एलईडी Google TV KD-55X85J (2021 मॉडेल)

sony-bravia-55-inches-4k-ultra-hd-smart-led-google-tv-kd-55x85j-2021-मॉडेल

Sony Bravia चा हा 4K Ultra HD Smart LED Google TV ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon वर ३५,७१० रुपये डिस्काउंटसह उपलब्ध आहे. डिस्काउंटनंतर सोनीच्या या टीव्हीला तुम्ही १,०४,१९० रुपयात खरेदी करू शकता. या टीव्हीमध्ये ५५ इंच 4K Ultra HD डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. बेस्ट साउंड आउटपूटसाठी कंपनीने यात डॉल्बी एटमॉस आणि X Balanced Speaker सह २० वॉट ऑडिओ आउटपूट दिला आहे.

TCL 55 इंच 4K अल्ट्रा HD प्रमाणित Android QLED TV 55C825

tcl-55-inches-4k-ultra-hd-certified-android-qled-tv-55c825

TCL 55 inches 4K Ultra HD Certified Android QLED TV स्मार्ट टीव्हीला तुम्ही ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉनवरून १,३०,९९१ रुपये डिस्काउंटसह खरेदी करू शकता. डिस्काउंटनंतर या टीव्हीसाठी तुम्हाला १,०८,९९९ रुपये मोजावे लागतील. टीसीएलच्या या टीव्हीमध्ये ५५ इंच 4K Ultra HD डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन ३८४०x२१६० पिक्सल आहे. याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. यामध्ये ३ जीबी ऱॅम आणि ३२ जीबी स्टोरेजसह दमदार साउंडसह ५० वॉटचे स्पीकर दिले आहेत.

LG 55 इंच 4K अल्ट्रा HD स्मार्ट एलईडी टीव्ही 55UP7740PTZ (2021 मॉडेल)

lg-55-inches-4k-ultra-hd-smart-led-tv-55up7740ptz-2021-मॉडेल

LG 55 Inches 4K Ultra HD Smart LED TV वर तब्बल ३५ टक्के सूट दिली जात आहे. ३५ टक्के डिस्काउंटनंतर ८९,९९० रुपयांच्या या टीव्हीला तुम्ही ई-कॉमर्स साइट अॅमेझॉनवरून ५७,८८० रुपयात खरेदी करू शकता. एलजीच्या या स्मार्ट टीव्हीमध्ये ५५ इंच ४के अल्ट्रा एचडी डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आहे. या टीव्हीमध्ये डाउन फायरिंग स्पीकर डायरेक्शनसह २० वॉट साउंड आउटपूट मिळते. या टीव्हीत इन-बिल्ट वाय-फाय सपोर्ट दिला असून, टीव्ही WebOS वर काम करतो. कनेक्टिव्हिटीसाठी यात ४ एचडीएमआय पोर्टसह अनेक पर्याय दिले आहेत.

सॅमसंग 55 इंच 4K अल्ट्रा HD स्मार्ट QLED टीव्ही QA55Q60TAKXXL (2020 मॉडेल)

samsung-55-inches-4k-ultra-hd-smart-qled-tv-qa55q60takxxl-2020-मॉडेल

नवी वर्षाच्या निमित्ताने तुम्ही जर घरी नवीन स्मार्ट टीव्ही आणण्याचा विचार करत असाल तर Samsung चा हा 4K Ultra HD Smart QLED TV उत्तम पर्याय ठरेल. सॅमसंगच्या या स्मार्ट टीव्हीवर तब्बल ५०,०१० रुपये डिस्काउंट मिळत आहे. डिस्काउंटनंतर या स्मार्ट टीव्हीला तुम्ही ८४,८९० रुपयात घरी नेऊ शकता. या टीव्हीमध्ये ५५ इंच ४के अल्ट्रा एचडी QLED डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आहे. दमदार साउंडसाठी यात डॉल्बी डिजिटल प्लससह २० वॉटचे स्पीकर दिले आहेत. या टीव्हीत ३ एचडीएमआय पोर्ट मिळतील.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here