सध्या एकापेक्षा जास्त कंपन्यांचे Premium स्मार्टफोन बाजारात उपलब्ध आहेत. या स्मार्टफोन्समध्ये जबरदस्त आणि अत्याधुनिक फीचर्स असल्यामुळे ते युजर्सना अधिक आवडतात. पण, किंमत अधिक असल्याने अनेकांना ते खरेदी करणे शक्य देखील होत नाही. म्हणून जर तुम्ही याच किमतीत एखादी फ्लॅगशिप स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही विशेष माहिती तुमच्यासाठीच. Flipkart चा Smartphone Year End Sale कालपासून म्हणजेच २६ डिसेंबरपासून सुरू झाला आहे, जो ३० डिसेंबरपर्यंत चालेल. या सेलमध्ये तुम्हाला iPhone 12, iPhone 12 Mini आणि Realme GT Master Edition सारख्या स्मार्टफोन्सवर आकर्षक डील आणि सूट मिळतील. यासोबतच या हँडसेटवर एक्सचेंज ऑफर आणि नो-कॉस्ट ईएमआय देखील देण्यात येणार आहे. आम्ही तुम्हाला या बातमीत काही निवडक डिव्हाइस बद्दल सांगणार आहोत, ज्यावर बंपर ऑफर्स उपलब्ध करून देण्यात आले आहे.

आयफोन १२

आयफोन-12

किंमत: ५४,१९९ रुपये

iPhone 12 खरेदी करायचा जर तुमचा विचार असेल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. iPhone 12 च्या खरेदीवर तुम्हाला Axis Bank कडून ५ टक्के कॅशबॅक मिळेल. यासोबतच खरेदीवर ११,७०१ रुपयांचा स्पेशल ऑफ मिळेल. यासोबतच फोनवर १, ८५३ रुपये प्रति महिना नो-कॉस्ट ईएमआय दिला जाईल. आता फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर iPhone 12 मध्ये ६.१ -इंचाचा रेटिना डिस्प्ले आहे. या फोनमध्ये A14 बायोनिक चिपसेट आणि १२ मेगापिक्सेल ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याशिवाय, फोनमध्ये मजबूत बॅटरी मिळेल.

आयफोन 12 मिनी

iphone-12-mini

किंमत:४१,१९९ रुपये

iPhone 12 Mini वर दरमहा १,४०९ चा No Cost EMI वर तुम्ही घरी आणू शकता. iPhone 12 Mini च्या खरेदीवर Axis बँकेकडून ५ टक्के सूट देण्यात येत आहे. १८,००० रुपयां पर्यंत सूट मिळेल. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ५.४ इंच स्क्रीन आणि १३ मेगापिक्सेलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याशिवाय स्मार्टफोनमध्ये A14 बायोनिक चिपसेट उपलब्ध असेल. iPhone 12 Mini कमी किमतीत खरेदी करण्याची याहून चांगली संधी ग्राहकांना मिळणार नाही.

Realme GT मास्टर संस्करण

realme-gt-master-edition

किंमत: २५,९९९ रुपये

Realme चा GT Master Edition हा एक उत्तम स्मार्टफोन आहे. या फोनमध्ये ६.४३ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. याशिवाय, स्मार्टफोनमध्ये ६४-मेगापिक्सलचा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आणि ३२-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळेल. यासोबतच ४३०० mAh बॅटरी आणि क्वालकॉमचा पॉवरफुल प्रोसेसर सपोर्ट करण्यात आला आहे. आता यावर उपलब्ध असलेल्या ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, ग्राहकांना फोनच्या खरेदीवर ४००० रुपयांची सूट आणि अॅक्सिस बँकेकडून ५ टक्के कॅशबॅक मिळेल. याशिवाय स्मार्टफोनवर ४,३३४ रुपयांची नो-कॉस्ट ईएमआय आणि १५,४५० रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जाईल.

मोटोरोला एज 20 फ्यूजन

motorola-edge-20-फ्यूजन

किंमत: २०,९९९ रुपये

युजर्ससाठी मोटोरोला एज 20 फ्यूजन हा नक्कीच एक चांगला पर्याय आहे. Axis Bank आपल्या ग्राहकांना Motorola Edge 20 Fusion स्मार्टफोनच्या खरेदीवर ५ टक्के कॅशबॅक देत आहे. एवढेच नाही तर या फोनवर ४००० रुपयांची विशेष सूट देखील मिळत आहे. सोबतच यावर ७२८ रुपयांची नो-कॉस्ट ईएमआय देखील मिळणार आहे. Motorola Edge 20 Fusion मध्ये १०८-मेगापिक्सेलचा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप, ३२ -मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा आणि ५००० mAh बॅटरी आहे. याशिवाय फोनमध्ये एमोलेड डिस्प्ले देकीहाळ ग्राहकांना मिळेल.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here