दावा
एका इन्स्टाग्रामवर एका तरूण जोडप्यांचा फोटो मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. एअरपोर्टवर उभ्या असलेल्या या तरुण-तरूणीने मास्क घातलेले आहे. ते अर्धवट खाली खेचलेले आहे. हे दोघेही इटलीतील डॉक्टर असून त्यांना करोना व्हायरस झाल्याने ते आता या जगात नाहीत, असा दावा या फोटोतून करण्यात येत आहे.

पोस्टमध्ये लिहिलेय, हे दोघेही इटलीचे डॉक्टर होते. दोघांनीही देशाची सेवा करीत आठव्या दिवशी आपले प्राण सोडले. आठव्या दिवसाआधी आयसोलेट होण्याआधी या दोघांनी एकमेकांना चुंबन घेतले. त्यानंतर अर्ध्या तासात या दोघांचा मृत्यू झाला. ईश्वर त्यांच्या आत्म्यांना शांती देवो.

या पोस्टवर आता पर्यंत इन्स्टाग्रामवर १ लाखांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे. आता हा फोटो मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

खरं काय आहे?

फोटोत दिसत असलेले तरूण-तरूणी इटलीचे डॉक्टर नाहीत.

कशी केली पडताळणी?

या फोटोला गुगलवर रिवर्स इमेज सर्च केल्यानंतर आम्हाला
च्या लाइव्ह ब्लॉगची लिंग मिळाली. ज्यात या फोटोचा वापर करण्यात आला आहे.

फोटोच्या वर लिहिले होते, ‘Love in the time of coronavirus’ आणि यासोबत एक कॅप्शन लिहिले होते. गुरुवारी स्पेनच्या बार्सिलोना एअरपोर्टवर एका कपलने एक दुसऱ्यांना चुंबन केले. युरोपहून आलेल्या लोकांना डोनाल्ड ट्रम्प यांनी बंदी घातली होती. यामुळे दुसऱ्यांदा फ्लाइट बुक करण्यासाठी लोकांना मोठा संघर्ष करावा लागला होता.

या फोटोसाठी Associated Press च्या Emilio Morenatti ला क्रेडिट दिले होते.

निष्कर्ष
स्पेनच्या बार्सिलोनाच्या विमानतळावर चुंबन घेत असलेला एका कपलचा फोटो आता इटलीतील डॉक्टरांचा म्हणून सोशलवर शेअर केला जात आहे, असे मटा फॅक्ट चेकच्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here