नवी दिल्लीः चीनच्या एका शहरात आलेला आज जगातील जवळपास सर्वच शहरात पोहोचला आहे. जगातील जवळपास २०० देशात करोना व्हायरसची लागण झाली आहे. या करोनाचा फटका जगातील सर्वच क्षेत्रांना बसला आहे. त्यामुळे जगाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. करोना व्हायरसचा फटका आता टेक्नोलॉजी जगातील दोन मोठ्या कंपन्यांना म्हणजेच फेसबुक आणि गुगलला बसला आहे.

एका रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे की, फेसबुक आणि गुगलला करोना व्हायरसमुळे यावर्षी २०२० मध्ये ४४ बिलियन डॉलर म्हणजेच ४४०० कोटी डॉलरचे नुकसान होवू शकते. या दोन्ही कंपन्यांना २०२० मध्ये करोना व्हायरसमुळे जाहिरातीत कमी आल्याने ४४०० कोटी डॉलरचे नुकसान होवू शकते. ग्लोबल इन्व्हेंस्टमेंट बँक आणि आर्थिक सेवा कंपनी कॉवेन अँड कंपनीच्या रिपोर्टनुसार, २०२० मध्ये गुगलचा निव्वळ नफा १२७.५ बिलियन डॉलर राहणार असल्याचा अंदाज होता. परंतु, करोना व्हायरसमुळे यात २८.६ बिलियन डॉलरची कमी येण्याची शक्यता आहे. कॉवेनच्या रिपोर्टनुसार, या वर्षी ट्विटरच्या कमाईत १८ टक्के कमी पाहायला मिळू शकते.

फेसबुकच्या संदर्भात कंपनीने म्हटले की, फेसबुकला यावर्षी जाहिरातीमधून ६७.८ बिलियन डॉलर नफा मिळण्याचा अंदाज होता. परंतु, करोना व्हायरसमुळे यात १५.७ बिलियन डॉलरची कमी पाहायला मिळू शकते. २०२१ मध्ये फेसबुक जाहिरातीच्या व्यापारात २३ टक्के वाढ पाहायला मिळू शकते, असा दावाही यात करण्यात आला आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here