ऑटोमोबाइल कंपनीकडून इतक्या मोठी रकमेची आर्थिक मदत अद्याप कोणत्याही कंपनीने केलेली नाही. याआधी एमजी मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने आपली मदत जाहीर केली आहे. करोना व्हायरसला हरवण्यासाठी बजाज कंपनीने मोठी घोषणा केली असून यावेळी म्हटले की, सरकार आपल्या २०० हून अधिक एनजीओच्या नेटवर्कसोबत करोना व्हायरसशी लढा देण्यासाठी गरजेच्या वस्तू उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच कंपनी पुण्यातील रुग्णालयासाठी आवश्यक आरोग्य इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेड करणार आहे. याआधी एमजी मोटरने करोना व्हायरसला रोखण्यासाठी २ कोटींची मदतीची घोषणा केली आहे. या आर्थिक मदतीतून सरकारी रुग्णालयात आवश्यक वस्तू देण्यात येतील. तसेच महिंद्र अँड महिंद्रा नेही करोना व्हायरसला रोखण्यासाठी रुग्णांसाठी व्हेंटिलेटर बनवण्याचे काम सुरू केले आहे.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times