डोमो स्लेट S7 4G कॉलिंग टॅब्लेट

DOMO Slate S7 4G Calling Tablet ची किंमत खूप कमी आहे. ७ इंच एचडी डिस्प्लेसह येणाऱ्या या कॉलिंग टॅबलेटमध्ये तुम्हाला १ गीगाहर्ट्ज मीडियाटेक एमटी८७३५ क्वाडकोर प्रोसेसर मिळेल. हा टॅबलेट अँड्राइड ६.० वर काम करतो. यात ३००० एमएएचचची दमदार बॅटरी दिली आहे. टॅबलेट ड्यूल सिम सपोर्ट आहे. यामध्ये १ जीबी रॅम आणि ८ जीबी स्टोरेज दिले आहे. या कॉलिंग टॅबला तुम्ही फ्लिपकार्टवरून फक्त ५,४९० रुपयात खरेदी करू शकता. यावर ६ महिन्यांची वॉरंटी मिळते.
मी N5 Wi-Fi+4G टॅब्लेट कॉल करतो

I Kall N5 Wi-Fi+4G Tablet मध्ये ७ इंच डिस्प्ले दिला आहे. या WiFi Calling Tablet मध्ये रियरला ५ मेगापिक्सल आणि फ्रंटला २ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. अँड्राइड ९ वर काम करणाऱ्या या टॅबलेटमध्ये पॉवरसाठी ३००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. हा ड्यूल-सिम टॅबलेट असून, यात वाय-फाय आणि कॉलिंग दोन्ही सुविधा मिळतात. टॅबमध्ये २ जीबी रॅमसह १६ जीबी स्टोरेज मिळते. फ्लिपकार्टवर हा टॅब ५,६९९ रुपयात उपलब्ध आहे. यावर १ वर्षाची वॉरंटी देखील मिळते.
मी N9 कॉलिंग टॅब्लेट कॉल करतो

या टॅबलेटमध्ये ७ इंच डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १०२४x६०० पिक्सल आहे. यात १.३ गीगाहर्ट्ज क्वाड-कोर प्रोसेसर आणि पॉवरसाठी ३००० एमएएचची दमदार बॅटरी मिळते. फोटोग्राफीसाठी यात २ मेगापिक्सल रियर कॅमेरा आणि फ्रंटला ०.३ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. यामध्ये २ जीबी रॅम आणि १६ जीबी स्टोरेज दिले असून, Amazon वर याची किंमत फक्त ४,७४९ रुपये आहे. टॅबवर १ वर्षाची वॉरंटी देखील मिळते.
मी KALL N13 4G कॉलिंग टॅब्लेट

I KALL N13 4G Calling Tablet मध्ये ७ इंच डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन ६००x१०२४ पिक्सल आहे. यात पॉवरसाठी ४००० एमएएचची दमदार बॅटरी मिळते. टॅब १.३ गीगाहर्ट्ज क्वाडकोर प्रोसेसरसह येतो. I KALL चा हा टॅब अँड्राइड ९.० वर काम करतो. यात फोटोग्राफीसाठी रियरला ५ मेगापिक्सल आणि फ्रंटला २ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. टॅबच्या २ जीबी रॅम आणि १६ जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत ५,९९९ रुपये आहे.
मी KALL N16 कॉलिंग टॅब्लेट

I KALL N16 Calling Tablet मध्ये ७ इंच डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन ६००x१०२४ पिक्सल आहे. यात पॉवरसाठी ४००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. टॅब १.३ गीगाहर्ट्ज क्वाडकोर प्रोसेसर दिला आहे. हा टॅब अँड्राइड ६.० वर काम करतो. यामध्ये २ जीबी रॅम आणि ८ जीबी स्टोरेज मिळते. फोटोग्राफीसाठी रियरला ५ मेगापिक्सल आणि फ्रंटला २ मेगापिक्सल कॅमेरा दिला आहे. फ्लिपकार्टवर हा टॅब सध्या फक्त ५,२४९ रुपयात उपलब्ध आहे.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times