दावा

अनेक सोशल मीडिया युजर्सने एक लिंक शेअर केली आहे. दिल्लीत कर्फ्यूत गरजेच्या वस्तूं खरेदी करण्यासाठी बाहेर जाण्यासाठी लोकांना ई-ट्रॅवल पास दिली जात आहे.

वेबसाइट https://epass.jantasamvad.org/epass/relief/english/ केवळ लोकांना ई-पास साठी अर्ज करण्याचा पर्याय देत नाही तर यात जेवण, रेशन, कामगारांसाठी ५ हजार रुपयांची नुकसान भरपाई आणि पेन्शन साठी अर्ज करण्याचा पर्याय या वेबसाइटवर आहे.

टाइम्स फॅक्ट चेकच्या काही वाचकांनी आम्हाला यासंबंधीची माहिती सांगितली. ही वेबसाइट सरकारची आहे की नाही, याची माहिती जाणून घेण्याची विनंती केली.

खरं काय आहे?

हो, ही वेबसाइट खरी आहे.

दिल्ली सरकारने गुरुवारी सकाळी ही वेबसाइट लोकांसाठी बनवली आहे. टाइम्स फॅक्ट चेकने दिल्ली सरकारच्या सूत्रांना या वेबसाइटसंबंधी विचारले असता ते म्हणाले की, ही वेबसाइट खरी आहे. तसेच या वेबसाइटची लिंकही खरी आहे. ही वेबसाइट लोकांच्या मदतीसाठी सुरू केली आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here