नवीन वर्ष सुरू झाले असून, यासोबतच वेगवेगळ्या ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म्सवर सेल देखील सुरू झाला आहे. ई-कॉमर्स साइट Flipkart वर देखील TV days sale २०२२ सुरू आहे. १ जानेवारीपासून सुरू झालेला हा सेल ५ जानेवारीपर्यंत चालणार आहे. तुम्ही जर नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Flipkart चा हा सेल तुमच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो. फ्लिपकार्ट सेलमध्ये अनेक ब्रँडेड टीव्हीवर आकर्षक ऑफर्सचा लाभ मिळत आहे. तुम्ही जर कमी किंमतीत मोठ्या स्क्रीनचा टीव्ही घरी आणण्याचा विचार करत असाल तर येथे तुम्हाला शानदार ऑफर्सचा फायदा मिळेल. या सेलमध्ये तुम्ही Blaupunkt, MI, Samsung, Realme आणि OnePlus चे ४३ इंच स्मार्ट टीव्ही स्वस्तात खरेदी करू शकता. Flipkart TV days sale मध्ये ऑफर्ससह उपलब्ध असलेल्या या टीव्हींविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Blaupunkt 43-इंच सायबर साउंड प्रीमियम 4K Android TV

blaupunkt-43-inch-cyber-sound-premium-4k-android-tv

Blaupunkt 43-inch Cyber sound premium 4K Android TV ची मूळ किंमत ४१,९९९ रुपये आहे. परंतु, ३३ टक्के डिस्काउंटनंतर तुम्ही टीव्हीला फक्त २७,९९९ रुपयात खरेदी करू शकता. या टीव्हीला तुम्ही दरमहिना फक्त ९१७ रुपये देऊन ईएमआयवर देखील खरेदी करता येईल. याशिवाय यावर एक्सचेंज ऑफरचा देखील लाभ मिळत आहे. तुम्ही जुना टीव्ही एक्सचेंज केल्यास ११ हजार रुपयांपर्यंत ऑफरचा लाभ मिळेल. तसेच, टीव्हीवर १ वर्षाची आणि एक्सेसरीजवर ६ महिन्यांची वॉरंटी मिळते.

Mi TV 4X 43 इंच

mi-tv-4x-43-इंच

Mi TV 4X 43 inch या स्मार्ट टीव्हीची मूळ किंमत ३४,९९९ रुपये आहे. मात्र, फ्लिपकार्ट सेलमध्ये १४ टक्के डिस्काउंटनंतर फक्त २९,९९९ रुपयात खरेदी करू शकता. या टीव्हीला तुम्ही ईएमआयवर देखील खरेदी करू शकता. दरमहिना फक्त १,०४० रुपये देऊन टीव्हीला ईएमआयवर घरी नेता येईल. तसेच, Mi च्या या ४३ इंच टीव्हीवर १ वर्षाची वॉरंटी दिली जात आहे. पॅनेलवर २ वर्षांची आणि एक्सेसरीजवर ६ महिन्यांची वॉरंटी मिळेल. यावर कोणतीही एक्सचेंज ऑफर नाही.

Realme 108 cm (43 इंच) अल्ट्रा HD (4K) LED स्मार्ट Android TV

realme-108-cm-43-inch-ultra-hd-4k-led-smart-android-tv

Realme च्या या ४३ इंच Ultra HD (४K) LED Smart Android TV ची मूळ किंमत ३२,९९९ रुपये आहे. मात्र, फ्लिपकार्ट सेलमध्ये ९ टक्के डिस्काउंटनंतर फक्त २९,९९९ रुपयात खरेदी करता येईल. रियलमीचा हा टीव्ही ईएमआयवर देखील उपलब्ध असून, दरमहिना फक्त १,०२६ रुपये देऊन टीव्ही खरेदी करू शकता. यावर एक्सचेंज ऑफरचा देखील फायदा मिळतो. जुना टीव्ही एक्सचेंज केल्यास ११ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळेल. तसेच, टीव्हीवर १ वर्षाची आणि डिस्प्ले पॅनेलवर २ वर्षाची वॉरंटी मिळते.

OnePlus Y मालिका 108 सेमी:

oneplus-y-मालिका-108-सेमी

OnePlus च्या या टीव्हीची मूळ किंमत २९,९९० रुपये आहे. परंतु, डिस्काउंटनंतर २९,५०० रुपयात खरेदी करू शकता. टीव्हीला दरमहिना १,००९ रुपये देऊन खरेदी करता येईल. सोबतच, १ वर्षाची कॉम्प्रेहेंसिव्ह आणि १ वर्षाची अतिरिक्त पॅनेल वॉरंटी मिळत आहे.

Vu प्रीमियम 108 सेमी (43 इंच) अल्ट्रा एचडी (4K) एलईडी स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही

या टीव्हीची मूळ किंमत ४५ हजार असून, ४० टक्के डिस्काउंटनंतर फक्त २६,९९९ रुपयात खरेदी करू शकता. दरमहिना ९३६ रुपये देऊन ईएमआयवर टीव्ही खरेदी करू शकता. तसेच, १ वर्षाची डोमेस्टिक वॉरंटी देखील मिळते.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here