Moto G60

Moto G60 स्मार्टफोनची किंमत फक्त १७,९९९ रुपये आहे. यामध्ये ६.८ इंच स्क्रीन दिली असून, याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. यात स्नॅपड्रॅगन ७३२जी प्रोसेसरसह ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मिळते. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला असून, यात मुख्य कॅमेरा १०८ मेगापिक्सल, ८ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि २ मेगापिक्सल डेप्थ लेंस आहे. फोनमध्ये फ्रंटला ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. यात पॉवरसाठी २० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ६००० एमएएचची बॅटरी मिळते.
Realme 8 Pro

Realme 8 Pro स्मार्टफोनची किंमत १९,९९९ रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये ६.४ इंच फुल एचडी प्लस सुपर एमोलेड डिस्प्ले दिला असून, यात ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मिळते. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवू शकता. यात १०८ मेगापिक्सल मुख्य कॅमेऱ्यासह क्वाड रियर कॅमेरा सेटअप आणि १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. पॉवरसाठी यात ४५०० एमएएचची बॅटरी दिली आहे. हा फोन क्वालकॉन स्नॅपड्रॅगन ७२०जी प्रोसेसर सपोर्टसह येतो.
Redmi Note 10 Pro Max

Redmi Note 10 Pro Max मध्ये फोटोग्राफीसाठी १०८ मेगापिक्सल प्रायमरी लेंस, ८ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेंस, २ मेगापिक्सल पोर्ट्रेट लेंस आणि ५ मेगापिक्सल मॅक्रो लेंस मिळते. तर सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये ६.६७ इंच डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन ७३२जी ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५०२० एमएएचची बॅटरी मिळते. Redmi Note 10 Pro Max स्मार्टफोनला तुम्ही फक्त १९,९९९ रुपयात खरेदी करू शकता.
Mi 11X Pro 5G

Mi 11X Pro 5G स्मार्टफोनमध्ये ६.७ इंच FHD+ डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. यात ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मिळते. फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला असून, यात १०८ मेगापिक्सल मुख्य कॅमेरा, ८ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड आणि ५ मेगापिक्सल मॅक्रो सेंसर आहे. तर सेल्फीसाठी फ्रंटला २० मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. ४५२० एमएएच बॅटरीसह येणाऱ्या या फोनला तुम्ही ३६,९९९ रुपयात खरेदी करू शकता.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times