सॅमसंग स्मार्ट वॉचवर अॅमेझॉन ऑफर: अॅमेझॉनच्या (Amazon) ऑफरमध्ये सॅमसंग गॅलेक्सी वॉच 3  (Samsung Galaxy Watch 3) अर्ध्यापेक्षा कमी किंमतीत उपलब्ध आहे. या घड्याळाची खासियत म्हणजे त्याचे डायल सामान्य घड्याळाप्रमाणे आणि स्मार्ट घड्याळाप्रमाणे ठेवता येते. एका दिवसापेक्षा जास्त वेळ या घड्याळ्याची बॅटरी टिकते. बॅटरी संपल्यावर सॅमसंग गॅलेक्सी फोनच्या बॅटरीने वायरलेस पद्धतीने बॅटरी वाढवता येते.

Samsung Galaxy Watch 3 45mm Bluetooth (Mystic Black), SM-R840NZKAINS
या सॅमसंग घड्याळाची किंमत 34,990 रुपये आहे. परंतु घड्याळावर 51% सूट मिळत आहे. त्यामुळे ऑफरमध्ये हे घड्याळ 16,990 रुपयांना खरेदी करता येईल. हे घड्याळ खरेदी करण्यासाठी  Axis Miles आणि More क्रेडिट कार्डांवर हजार रुपये सूट आहे. च्या क्रेडिट कार्डांवर हजार रुपयांची सूट देण्यात येणार आहे. कोटक बँक आणि बँक ऑफ बडोदा च्या कार्ड्सने EMI केल्यास 7.5% किंवा रु. 1,500 पर्यंतची सूट आहे.

Samsung Galaxy Watch 3 ची वैशिष्ट्ये
– हे घड्याळ सोनेरी, चंदेरी आणि काळ्या रंगात उपलब्ध आहे. वर्तुळाकार डायल असून त्याला चामड्याचा पट्टा आहे. त्यामुळे ते खूप स्टायलिश दिसते. – या घड्याळाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची स्क्रीन सामान्य घड्याळाप्रमाणे तसेच स्मार्ट घड्याळाप्रमाणेदेखील ठेवता येते.
– या घड्याळाची बॅटरी एकदा चार्ज केल्यास दिवसभर चालते. तसेच सॅमसंगच्या फोनचा वायरलेस पॉवर बूस्टचा पर्यायही आहे, ज्यामुळे हे घड्याळ फोनच्या बॅटरीमधून चार्ज होते.
– या घड्याळाचा डायल 45mm असून ब्लूटूथलादेखील जोडतो.
– हे घड्याळ Android 5.0 किंवा त्यावरील ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या फोनशी सुसंगत आहे.
– आरोग्याच्या दृष्टीनेदेखील हे घड्याळ फायदेशीर आहे. रक्तातील ऑक्सिजन पातळी देखील तपासता येते.
– या घड्याळात 120 हून अधिक वर्कआउट प्रोग्राम आहेत.

संबंधित बातम्या

Amazon Deal: 43 इंच स्मार्ट टीव्हीची उत्तम डील, 15 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करा इन बिल्ट Alexa आणि Fire stick स्मार्ट टीव्ही

Apple Iphone : तुम्हीही आयफोन वापरताय? अॅपल कंपनी ‘हे’ तीन मॉडेल्स करणार बंद

UPI Transactions : भारतात UPI नं गाठला नवा उच्चांक; डिसेंबर 2021 मध्ये 456 कोटींचं ट्रान्जेक्शन

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

technology

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here