भारतात फीचर फोन वापरणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. मात्र, फीचर फोनमध्ये स्मार्टफोनच्या तुलनेत खूपच कमी सुविधा उपलब्ध असतात. तुम्ही देखील फीचर फोन वापरत असाल व स्मार्टफोनमध्ये अपग्रेड करण्याचा विचार करत असाल तर बाजारात काही चांगले डिव्हाइस उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे या फोन्सची किंमत देखील खूपच कमी आहे. बाजारात ६ हजार रुपयांच्या बजेटमध्ये येणारे काही चांगले एंट्री लेव्हल स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. या फोन्सद्वारे तुम्ही दैनंदिन कामे सहज करू शकता. या बजेटमध्ये तुम्ही Lava Z61 Pro, Itel A25 Pro, Samsung M01 Core, Micromax iOne आणि itel A23 Pro स्मार्टफोनला खरेदी करू शकता. प्रमुख ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म्स अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर हे फोन तुम्हाला स्वस्तात मिळतील. या ब्रँडेड फोन्सच्या किंमत आणि फीचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

लावा Z61 प्रो

lava-z61-pro

Lava Z61 Pro स्मार्टफोनच्या २ जीबी रॅम आणि १६ जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंटला तुम्ही अ‍ॅमेझॉनवरून फक्त ५,९९९ रुपयात खरेदी करू शकता. या फोनमध्ये ५.४५ इंच डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन ७२०x१४४० पिक्सल आहे. हा फोन अँड्राइड ११ वर काम करतो. यामध्ये १.८ GHz ऑक्टा कोर प्रोसेसर दिला आहे. फोटोग्राफीसाठी यात ८ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. पॉवरसाठी ३१०० एमएएचची बॅटरी दिली आहे.

Itel A25 Pro

itel-a25-pro

Itel A25 Pro या स्मार्टफोन ई कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉनवर फक्त ४,८९९ रुपयात उपलब्ध आहे. फोनमध्ये ५.०० इंच डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन ७२०x१२८० पिक्सल आहे. यात १.४ हर्ट्ज क्वाडकोर प्रोसेसर दिला आहे. फोटोग्राफीसाठी यात रियरला ५ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. Itel A25 Pro स्मार्टफोनमध्ये पॉवरसाठी यात ३०२० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे.

Samsung M01 Core

samsung-m01-core

Samsung M01 Core च्या १६ च्या स्टोरेज व्हेरिएंटला तुम्ही रिलायन्स डिजिटलवरून स्वस्तात खरेदी करू शकता. या फोनची किंमत ५,१९९ रुपये आहे. यामध्ये ५.३० इंच डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन ७२०x१४८० पिक्सल आहे. यात मीडियाटेक एमटी६७३९ क्वाडकोर प्रोसेसर दिला आहे. यात १ जीबी रॅम आणि १६ जीबी स्टोरेज मिळते. तर फोटोग्राफीसाठी ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. तर फ्रंटला ५ मेगापिक्सल कॅमेरा मिळतो. यात ३००० एमएएचची बॅटरी मिळते.

मायक्रोमॅक्स iOne

मायक्रोमॅक्स-आयोन

Micromax iOne या स्मार्टफोनमध्ये २ जीबी रॅम आणि १६ जीबी इंटर्नल मेमरी दिली आहे. फोनमध्ये ५.४५ इंच एचडी डिस्प्ले मिळतो. यात फोटोग्रापीसाटी रियरला ५ मेगापिक्सल आणि फ्रंटला सेल्फीसाठी ५ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. तर पॉवरसाठी यात २२०० एमएएचची बॅटरी मिळते. ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर Micromax iOne स्मार्टफोन फक्त ५,९९९ रुपयात उपलब्ध आहे. या फोनद्वारे तुम्ही दैनंदिन कामे सहज करू शकता.

itel A23 Pro

itel-a23-pro

Itel A23 Pro स्मार्टफोनला देखील ६ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता. यामध्ये ५.० इंच डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन ४८०x८५४ पिक्सल आहे. यात क्वाड कोर १.४ GHz प्रोसेसरसह १ जीबी रॅम आणि ८ जीबी इंटर्नल स्टोरेज मिळते. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डने ३२ जीबीपर्यंत वाढवू शकता. फोन अँड्राइड १०.० गो एडिशनवर काम करतो. यात रियरला २ मेगापिक्सल आणि फ्रंटला ०.३ मेगापिक्सल कॅमेरा मिळतो. पॉवरसाठी २४०० एमएएचची बॅटरी दिली आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here