भारतात गेल्या काही वर्षापासून ५जी कनेक्टिव्हिटीची जोरदार चर्चा सुरू आहे. यावर्षी अखेर ५जी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. ५जी सुरू झाले नसले तरीही भारतीय बाजारात ५जी स्मार्टफोनला जोरदार मागणी आहे. तुम्ही देखील नवीन ५जी स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. खासकरून शाओमीच्या ५जी फोन्सवर आकर्षक ऑफर मिळत आहे. ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉनवर Xiaomi Flagship Days Sale सुरू आहे. ४ जानेवारीपासून सुरू झालेला हा सेल १० जानेवारीपर्यंत चालेल. या सेलमध्ये शाओमीच्या फ्लॅगशिप फोन्सला कमी किंमतीत खरेदी करता येईल. शाओमीने या सेलसाठी City Bank सोबत पार्टनरशिप केली आहे. बँकेच्या कार्ड्सने पेमेंट केल्यावर यूजर्सला २ हजार रुपयांपर्यंत इंस्टंट डिस्काउंट मिळेल. Xiaomi Flagship Days Sale मध्ये स्मार्टफोन्सवर मिळणाऱ्या या ऑफर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Mi 11X 5G

mi-11x-5g

Mi 11X 5G स्मार्टफोनची मूळ किंमत ३३,९९९ रुपये आहे. परंतु, फोनला Xiaomi Flagship Days Sale मध्ये फक्त २२,९९९ रुपयात खरेदी करू शकता. या फोनवर यूजर्सला अतिरिक्त ५ हजार रुपये एक्सचेंज डिस्काउंट मिळेल. या फोनचे वैशिष्ट्य म्हणजे यात ६.६७ इंच FHD+ (१०८०x२४००) AMOLED Dot डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. यात Qualcomm Snapdragon ८७० ५G प्रोसेसरचा सपोर्ट दिला आहे.

Mi 11X Pro 5G

mi-11x-pro-5g

Mi 11X Pro 5G स्मार्टफोनची मूळ किंमत ४७,९९९ रुपये आहे. परंतु, फ्लॅगशिप सेलमध्ये फोनला फक्त ३१,९९९ रुपयात खरेदी करू शकता. या फोनवर ३ हजार रुपये एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. याशिवाय फोनवर २ हजार रुपयांचे अ‍ॅमेझॉन कूपन देखील मिळते. Mi 11X Pro 5G मध्ये फोटोग्राफीसाठी यात १०८ मेगापिक्सलचा दमदार कॅमेरा दिला आहे. तसेच, Qualcomm Snapdragon ८८८ ५G प्रोसेसरचा देखील सपोर्ट मिळतो.

Xiaomi Mi Lite NE 5G

xiaomi-mi-lite-ne-5g

या लिस्टमधील तिसरा फोन Xiaomi Mi Lite NE 5G हा आहे. हा २०२१ मधील सर्वात पातळ आणि हलका फोन आहे. या फोनची मूळ किंमत ३१,९९९ रुपये आहे. परंतु, सेलमध्ये फक्त २१,९९९ रुपयात खरेदी करू शकता. या फोनवर अतिरिक्त ५ हजार रुपये एक्सचेंज ऑफर मिळते. याशिवाय प्रीपेड ट्रांजॅक्शनवर २ हजार रुपये अतिरिक्त डिस्काउंट देखील मिळेल. फोनमध्ये Qualcomm Snapdragon ७७८ ५G प्रोसेसर मिळतो.

Mi 11 Lite

mi-11-lite

Mi 11 Lite स्मार्टफोनची मूळ किंमत २४,९९९ रुपये आहे. या फोनला फ्लॅगशिप सेलमध्ये फक्त २१,४९९ रुपयात खरेदी करू शकता. फोनवर २१,६०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा देखील लाभ मिळत आहे. फोनवर Reward Mi अंतर्गत ५०० रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल. Mi 11 Lite फोनमध्ये Qualcomm Snapdragon ७३२जी चिपसेट आणि ६.५ इंच डिस्प्ले दिला आहे. यात फोटोग्राफीसाठी ६४ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि फ्रंटला १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.

Mi 10i

mi-10i

Xiaomi Flagship Days Sale लिस्टमधील हा पाचवा फोन आहे. Mi 10i स्मार्टफोनची किंमत २४,९९९ रुपये आहे. परंतु, सेलमध्ये फक्त २१,४९९ रुपयात खरेदी करता येईल. या फोनवर देखील २१,६०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळतो. या फोनवर Reward Mi अंतर्गत ५०० रुपये अतिरिक्त सूट दिली जात आहे. यामध्ये १०८ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, Octa-core Snapdragon ७५०G चिपसेट आणि ६.६७ इंच डिस्प्ले मिळतो.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here