रेडमी 10 प्राइम

Redmi 10 Prime स्मार्टफोनला तुम्ही फक्त १२,४९९ रुपयात खरेदी करू शकता. यामध्ये ६.५ इंच FHD+ डिस्प्ले दिला आहे. यात मीडियाटेक हीलियो जी८८ चिपसेटचा सपोर्ट मिळतो. फोटोग्राफीसाठी यात क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला असून, यात ५० मेगापिक्सल मुख्य कॅमेरा, ८ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेंस, २ मेगापिक्सल मॅक्रो लेंस आणि २ मेगापिक्सल डेप्थ सेंसरचा सपोर्ट मिळतो. फ्रंटला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. हा फोन अँड्राइड ११ आधारित MIUI १२.५ वर काम करतो. यात ६००० एमएएचची बॅटरी दिली आहे.
Realme 8i

Realme 8i स्मार्टफोनची किंमत १४,९९९ रुपये आहे. हा फोन अँड्राइड ११ ओएसवर काम करतो. यामध्ये ६.६ इंच एचडी प्लस डिस्प्ले, ऑक्टा-कोर MediaTek Helio G९६ प्रोसेसर दिला आहे. फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला असून, याचा मुख्य कॅमेरा ५० मेगापिक्सल आहे. तसेच, २ मेगापिक्सल लेंस मिळते. सेल्फीसाठी फ्रंटला १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. पॉवरसाठी १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची दमदार बॅटरी मिळते.
Infinix Note 11

Infinix Note 11 स्मार्टफोनमध्ये ६.७ इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १०८०x२४०० पिक्सल आहे. यात ऑक्टाकोर मीडियाटेक हीलियो जी८८ प्रोसेसरचा सपोर्ट दिला असून, फोन अँड्राइड ११ आधारित XOS १० कस्टम स्किनवर काम करतो. यामध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला असून, यात ५० मेगापिक्सल मुख्य कॅमेरा, २ मेगापिक्सल सेंसर आणि एक एआय लेंस मिळते. फ्रंटला १६ मेगापिक्सल कॅमेरा दिला आहे. तर ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसाठी ५००० एमएएचची बॅटरी मिळते. फोन १२,४९९ रुपयात उपलब्ध आहे.
Realme Narzo 50A

Realme Narzo 50A स्मार्टफोनमध्ये ६.५ इंच मिनी ड्रॉप फुल स्क्रीन डिस्प्ले दिला असून, याचे स्क्रिन रिझॉल्यूशन ७२०x१६०० पिक्सल आहे. यात रियरला ५० मेगापिक्सल मुख्य कॅमेरा, २ मेगापिक्सल पोर्ट्रेट आणि एक मॅक्रो लेंस मिळते. तर सेल्फीसाठी ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. हा फोन MediaTek Helio G८५ गेमिंग प्रोसेसर सपोर्टसह येतो. यात १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ६००० एमएएचची बॅटरी मिळते. हँडसेटला फक्त ११,४९९ रुपयात खरेदी करू शकता.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times