तुम्ही जर नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Amazon ने ग्राहकांसाठी एका खास सेलची घोषणा केली आहे. Amazon ने मोबाइल आणि टीव्ही सेलची घोषणा केली असून, हा सेल १० जानेवारी २०२२ पर्यंत चालेल. या सेलमध्ये अनेक ब्रँडेड स्मार्टफोन्सवर आकर्षक ऑफर्सचा फायदा मिळत आहे. तुम्ही जर कमी बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा सेल तुमच्या फायद्याचा ठरेल. या सेलमध्ये तुम्ही कमी किंमतीत OnePlus Nord CE 5G, Samsung Galaxy M52 5G, OnePlus 9R, iQoo Z5, Xiaomi Mi 11X आणि iQoo 7 5G स्मार्टफोनला खरेदी करू शकता. या फोन्सवर बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफरचा लाभ देखील मिळेल. Amazon सेलमध्ये दमदार फीचर्ससह स्वस्तात उपलब्ध असलेल्या या स्मार्टफोन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

OnePlus Nord CE 5G

oneplus-north-ce-5g

OnePlus Nord CE 5G स्मार्टफोनला Amazon coupon चा वापर करून फक्त २३,४९९ रुपयात खरेदी करू शकता. याशिवाय या फोनवर १४,९०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा देखील लाभ मिळतो. वनप्लसच्या या दमदार स्मार्टफोनमध्ये ६.४ इंच फुल एचडी+ डिस्प्ले, ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७५०जी प्रोसेसर मिळतो. OnePlus Nord CE 5G मध्ये पॉवरसाठी यात ३०T Plus Warp Charge फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४५०० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे.

Samsung Galaxy M52 5G

samsung-galaxy-m52-5g

Samsung Galaxy M52 5G स्मार्टफोन Amazon वर २९,९९९ रुपयात उपलब्ध करण्यात आला आहे. फोनला ५ हजार रुपये फ्लॅट डिस्काउंटनंतर स्वस्तात खरेदी करू शकता. Amazon coupon चा वापर केल्यास फोन फक्त २४,९९९ रुपयात उपलब्ध होईल. याशिवाय, १४,९०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा देखील फायदा मिळतो. फोनमध्ये ६.७ इंच इनफिनिटी-ओ डिस्प्ले, octa-core Qualcomm Snapdragon ७७८जी प्रोसेसर दिला आहे. हा फोन अँड्राइड ११ वर काम करतो. यात २५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची बॅटरी दिली आहे.

OnePlus 9R

oneplus-9r

OnePlus 9R स्मार्टफोनला सेलमध्ये ३६,९९९ रुपयात खरेदी करू शकता. Amazon coupon चा फायदा मिळाल्यास फोनवर ३ हजार रुपये इंस्टंट डिस्काउंट मिळेल. याशिवाय फोनवर १४,९०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळत आहे. स्वस्त वनप्लस ९ सीरिजमध्ये octa-core Qualcomm Snapdragon ८७० प्रोसेसरसह ८ जीबी / १२ जीबी रम मिळते. यात ४८ मेगापिक्सल क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. पॉवरसाठी ६४ वॉट Wrap चार्ज सपोर्टसह ४५०० एमएएचची बॅटरी दिली आहे.

iQoo Z5

iqoo-z5

iQoo Z5 स्मार्टफोन Amazon वर २३,९९० रुपयात उपलब्ध आहे. मात्र, २ हजार रुपयांच्या कुपनचा फायदा मिळाल्यास फोन फक्त २१,९९० रुपयात तुमचा होईल. यावर तब्बल १७,९०० रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. पॉवरसाठी यात ५००० एमएएचची दमदार बॅटरी देखील मिळते. iQoo Z5 स्मार्टफोन Qualcomm Snapdragon ७७८जी प्रोसेसरचा सपोर्ट दिला आहे. यात ८ जीबीपर्यंत रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज दिले आहे.

Xiaomi Mi 11X

xiaomi-mi-11x

Xiaomi Mi 11X ची किंमत २७,९९९ रुपये आहे. मात्र, डिस्काउंट आणि कॅशबॅकचा फायदा मिळाल्यास फोनला फक्त २३,४९९ रुपयात खरेदी करू शकता. याशिवाय फोनवर १९,९०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा देखील फायदा मिळतो. Qualcomm Snapdragon ८७० चिपसेटसह येणारा हा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. हा फोन अँड्राइड ११ वर काम करतो व यात ४८ मेगापिक्सल क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. पॉवरसाठी ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४५२० एमएएचची बॅटरी मिळते.

IQoo 7 5G

संकलन-7-5 ग्रॅम

iQoo 7 5G स्मार्टफोन २९,९९० रुपयात साइटवर लिस्ट करण्यात आला आहे. या फोनवर २ हजार रुपये फ्लॅट डिस्काउंट आणि २ हजार रुपये Amazon coupon मिळते. याशिवाय फोनवर १७,९०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा देखील फायदा मिळतो. यामध्ये octa-core Qualcomm Snapdragon ८७० प्रोसेसरचा सपोर्ट मिळतो. हा फोन अँड्राइड ११ ओएसवर काम करतो. यात पॉवरसाठी ६६ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४४०० एमएएचची बॅटरी मिळते. फोनमध्ये ६.६२ इंच फुल एचडी डिस्प्ले दिला आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here