बार्कच्या रेटिंगनुसार, १९ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण १९१ टीव्ही चॅनेलवर दाखवण्यात आले होते. गेल्या वर्षी ८ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम ३७० रद्द करण्यात आल्याचे भाषण केले होते. ते १६३ चॅनेलवर दाखवण्यात आले होते. तसेच ६.५ कोटी लोकांनी हे भाषण ऐकले होते. तर नोटबंदीचे भाषण ८ नोव्हेंबर २०१६ रोजी ११४ चॅनेलवर दाखवण्यात आले होते. हे भाषण ५.७ कोटी लोकांनी पाहिलं होतं. म्हणजेच संबंधीचं भाषण आता पर्यंत सर्वात जास्त पाहिलं गेलेलं मोदींचं भाषण ठरलं आहे.
करोना व्हायरस मुळे भारतात लॉकडाऊन करण्यात आले आहे. सरकारने करोनाला रोखण्यसाठी हेल्पलाइन नंबर, व्हॉट्सअॅप नंबर, मेल आणि अॅप लाँच केले आहेत. लोकांना यावरून करोना संबंधीची माहिती देण्यात येत आहे.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times