हायलाइट्स:

  • Moto G71 5G चे डिटेल्स लीक
  • लिक्समधून काही माहिती समोर
  • फोनमध्ये मल्टीटास्किंगसाठी स्नॅपड्रॅगन ६९५ प्रोसेसर

नवी दिल्ली : हँडसेट निर्माता Motorola पुढील आठवड्यात १० जानेवारी रोजी भारतात आपला नवीन स्मार्टफोन Moto G71 लाँच करणार आहे. हा हँडसेट आधीच जागतिक बाजारात लाँच झाला आहे. पण , आता Moto G71 5G ची भारतीय किंमत लाँच होण्यापूर्वीच लीक झाली आहे. याशिवाय, फ्लिपकार्टवर या मोटोरोला मोबाइल फोनसाठी एक मायक्रोसाइट तयार करण्यात आली आहे. ज्यामुळे फोनचे वैशिष्ट्ये देखील कन्फर्म झाले आहे (भारतीय प्रकारातील).

वाचा: Voter ID Card: Voter ID Card साठी ‘असा’ करा अप्लाय, घर बसल्या होईल काम, अर्ज करण्याची प्रोसेस खूपच सोप्पी, पाहा स्टेप्स

टिपस्टर अभिषेक यादवने ट्विटर युजर विजय श्रीराम यांच्या ट्विटवरून सांगितले की, भारतात या हँडसेटची किंमत १८,९९९ रुपये असू शकते.

ट्विट

(फोटो: ट्विटर/अभिषेक यादव)

Moto G71 5G तपशील:

मोटोरोलाच्या या मोबाईल फोनमध्ये स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी स्नॅपड्रॅगन ६९५ प्रोसेसर असेल. हा फोन भारतात या चिपसेटसह येणारा पहिला फोन आहे. याशिवाय, Moto G71 5G फोनमध्ये १३ 5G बँड आणि ड्युअल-सिम 5G सपोर्ट असेल. या Motorola स्मार्टफोनमध्ये ६.४ -इंचाचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले आहे, ४०९ पिक्सेल प्रति इंच रिझोल्यूशन आहे, कमाल ब्राइटनेस ७०० nits आहे.

५० मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, ८ मेगापिक्सेल दुय्यम कॅमेरा, डेप्थ आणि मॅक्रो कॅमेरा सेन्सरचा समावेश असेल. ३३ W जलद चार्जिंग सपोर्टसह ५००० mAh ची शक्तिशाली बॅटरी, पाणी प्रतिरोधक IP52 रेटिंग. फोनमध्ये ६ जीबी रॅमसह १२८ जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल आणि बूस्टसाठी २ जीबी रॅम देण्यात आली आहे. Moto G71 5G हँडसेटला २ वर्षांसाठी सुरक्षा अपडेट मिळत राहतील.

वाचा: Recharge Plans: या कंपनीच्या प्लान्समध्ये स्वस्तात मिळवा Disney+ Hotstar सह हे बेनिफिट्स,असा घ्या लाभ, पाहा डिटेल्स

वाचा: Smartwatch: जबरदस्त बॅटरी बॅकअपसह Fire-Boltt Ninja 2 लाँच, किंमत २ हजारांपेक्षाही कमी, पाहा फीचर्स

वाचा: Motorola: धुमाकूळ घालायला लवकरच भारतात येतोय Motorola Edge 30 Pro, मिळतील हे सुपरहिट फीचर्स, पाहा डिटेल्स

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here