सध्या स्मार्ट टीव्हीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेकदा आपण घरात जुना टीव्ही असल्याने स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याकडे वळत नाही. मात्र, तुम्ही काही स्वस्त डिव्हाइसच्या माध्यमातून तुमच्या जुन्या डब्बा टीव्हीलाच स्मार्ट बनवू शकता. या डिव्हाइसच्या मदतीने तुम्ही इंटरनेटशी कनेक्ट करून जुन्या टीव्हीवरच स्ट्रीमिंगचा आनंद घेऊ शकता. तुम्ही ऑडिओसाठी टीव्हीला ३.५ एमएम हेडफोनद्वारे साउंडबार देखील कनेक्ट करू शकता. मात्र, लक्षात घ्या की कोणत्याही जुन्या टीव्हीला स्मार्ट अँड्राइट टीव्ही बॉक्सशी कनेक्ट करण्यासाठी HDMI पोर्ट असणे गरजेचे आहे. जर तुमच्या जुन्या स्मार्ट टीव्हीमध्ये HDMI पोर्ट नसल्यास तुम्ही HDMI ने AV/ARC कनव्हर्टरचा देखील वापर करू शकता. याशिवाय तुमच्याकडे वाय-फाय कनेक्टिव्हिटी देखील असणे गरजेचे आहे. जुन्या टीव्हीला स्मार्ट बनवणाऱ्या अशाच काही डिव्हाइसबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

अॅलेक्सा व्हॉइस रिमोटसह अॅमेझॉन फायर टीव्ही स्टिक

amazon-fire-tv-स्टिक-with-alexa-voice-remote

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल सांगायचे तर Amazon Fire TV Stick अ‍ॅलेक्सा वॉइस रिमोट कंट्रोल सपोर्टसह येते. यामुळे शानदार स्मार्ट टीव्ही एक्सपीरियन्स मिळतो. याद्वारे तुम्ही युट्यूबसह सर्व लोकप्रिय स्ट्रीमिंग अ‍ॅप्सला अ‍ॅक्सेस करू शकता. तुम्ही जुन्या टीव्हीसाठी Fire TV Stick चे स्वस्त नॉन-४के व्हर्जन निवडू शकता. Fire TV Stick टीव्हीशी थेट एचडीएमआय पोर्टद्वारे कनेक्ट होते. Amazon Fire TV Stick ला तुम्ही फक्त ३,९९९ रुपयात खरेदी करू शकता.

Xiaomi Mi Box 4K

xiaomi-mi-box-4k

Xiaomi Mi Box 4K द्वारे जुन्या टीव्हीला स्मार्ट टीव्हीमध्ये बदलू शकता. हे डिव्हाइस सर्व लोकप्रिय स्ट्रीमिंग अ‍ॅप्सला सपोर्ट करते व याद्वारे गुगल प्ले स्टोवरील अ‍ॅप्सचा देखील अ‍ॅक्सेस मिळतो. Mi Box 4K यूजर्सला HDR 10 आणि Dolby Atmos सपोर्ट प्रदान करतो. यामध्ये बिल्ट-इन गुगल असिस्टेंटचा देखील सपोर्ट दिला असून, याद्वारे बॉक्सला कंट्रोल करू शकता. कनेक्टिव्हिटीसाठी यात HDMI, USB 2.0 आणि ब्लूटूथ मिळते. याची किंमत फक्त ३,४९९ रुपये आहे.

Tata Sky Binge+ Android सेट-टॉप-बॉक्स

tata-sky-binge-android-set-top-box

Tata Sky Binge+ अँड्राइड सेटटॉप बॉक्सद्वारे यूजर्स आपल्या लॅपटॉप, टॅबलेट आणि फोनमध्ये कुठेही चित्रपट, सीरिज, म्यूझिक आणि गेम खेळण्याचा आनंद घेऊ शकतात. इन-बिल्ट क्रोमकास्ट फीचरमुळे थेट टीव्हीवर स्ट्रीमिंगचा आनंद घेऊ शकता. यात गुगल असिस्टेंटचा देखील सपोर्ट मिळतो. यूजर्सला गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध गेम्स आणि अ‍ॅप्सचा देखील अ‍ॅक्सेस मिळतो. डिव्हाइस ४के, एचडी एलईडी, एलसीडी आणि प्लाझ्मा टेक्नोलॉजीवरील सर्व टीव्हीसोबत काम करते. याची किंमत ३,९९९ रुपये आहे.

ACT प्रवाह टीव्ही 4K

act-stream-tv-4k

ACT Stream TV 4K हा एक अँड्राइड टीव्ही बॉक्स असून, याद्वारे स्वस्त एलईडी टीव्हीला स्मार्ट बनवू शकता. याद्वारे सर्व लोकप्रिय स्ट्रीमिंग अ‍ॅप्ससह गुगल असिस्टेंट आणि गुगल प्ले स्टोरचा सपोर्ट मिळते. यूजर्स या डिव्हाइसला रेंटल प्लानसह खरेदी करू शकतात. यामध्ये ८ जीबी इंटर्नल स्टोरेज मिळते. डिव्हाइसला HDMI द्वारे कनेक्ट करू शकता. ACT Stream TV 4K डिव्हाइसला तुम्ही ४,४९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता.

एअरटेल एक्सस्ट्रीम बॉक्स

airtel-xstream-box

Airtel Xstream Box मध्ये Android ९ Pie ऑपरेटिंग सिस्टम दिली आहे. यात गुगल असिस्टेंटचा सपोर्ट दिला असून, वॉइस इनेबल रिमोट कंट्रोल फीचर मिळते. याद्वारे लोकप्रिय स्ट्रीमिंग अ‍ॅप्सला अ‍ॅक्सेस करू शकता. या बॉक्सची किंमत ३,९९९ रुपये आहे.

Dish SMRT Hub Android HD सेट टॉप बॉक्स

Dish SMRT Hub Android HD Set Top Box द्वारे गुगल प्ले स्टोर आणि गुगल असिस्टेंटचा सपोर्ट मिळतो. याद्वारे तुम्ही लोकप्रिय स्ट्रीमिंग अ‍ॅप्सला अ‍ॅक्सेस करू शकता. यात बिल्ट-इन क्रोमकास्ट, अ‍ॅलेक्सा सपोर्टसह एक वेगळे डिश टीव्ही स्मार्ट किट डोंगल दिले असून, याद्वारे ऑनलाइन स्ट्रीमिंग अ‍ॅप्सला अ‍ॅक्सेस करू शकता. या डिव्हाइसची किंमत ३,९९९ रुपये आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here