नवी दिल्लीः ३१ मार्च रोजी चीनमध्ये आपला नवीन ५ जी स्मार्टफोन लाँच करणार आहे. याआधी कंपनीने आपल्या नव्या स्मार्टफोनचा एक व्हिडिओ जारी केला आहे. ज्यात फोनसंबंधीच्या काही फीचर्सची माहिती लीक झाली आहे. हा फोन दोन रंगात उपलब्ध होणार आहे, अशी माहिती कंपनीने दिली आहे.

Vivo S6 5G चे फीचर्स

चिनी सोशल मीडिया साइटवर वर विवोने आपला 5G चा प्रोमो व्हिडिओ शेअर केला आहे. यावरून हा फोन ब्लू आणि व्हाईट या दोन रंगात उपलब्ध करण्यात येणार असल्याचे समजते. तसेच फोटोसाठी रियरमध्ये सर्कुलर कॅमेरा मॉडेल दिला आहे. या फोनच्या फ्रंटला नॉच डिस्प्ले सह सिंगल कॅमेरा दिला जाणार आहे. तसेच फोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर चा वापर करण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये ३.५ एमएम चे हेडफोन जॅक टॉप मिळणार आहे. फोनच्या बाजुच्या साइटला आवाजाचे आणि पॉवर बटन दिल्याचे यात दिसत आहे.

Vivo S6 5G प्रोसेसर

याआधी या फोनमध्ये या वेबसाइटवर पाहिले गेले होते. यावरून या फोनच्या अन्य फीचर्स समोर आले होते. रिपोर्टनुसार, कंपनीने फोनमध्ये ६.४४ इंचाचा फुल एचडी प्लस अमोलेड डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्युशन १०८०x२४०० पिक्सल आहे. तसेच हा फोन अँड्रॉयड १० ओएसवर काम करणार आहे. या फोनच्या स्पीडसाठी सॅमसंग एक्सिनॉस ९८० चिपसेटचा वापर केला आहे.

Vivo S6 5G कॅमेरा

६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेज या दोन पर्यायात कंपनी हा स्मार्टफोन लाँच करण्याची शक्यता आहे. फोटोग्राफीसाठी क्वॉड रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिला जाणार आहे. यात पहिला कॅमेरा ४८ मेगापिक्सलचा, ८ मेगापिक्सलचा सेन्सर आणि २ प्लस २ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाणार आहे. तर फ्रंटला ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्याची शक्यता आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here