जगातील सर्वात मोठा कंझ्यूमर इलेक्ट्रॉनिक शो (CES 2022) समाप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील लॉस वेगसमध्ये ५-७ जानेवारी दरम्यान CES 2022 चे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी अनेक शानदार गॅजेट्स सादर करण्यात आले. CES 2022 मध्ये पहिल्यांदाच कोणत्या भारतीय कंपनीने भाग घेतला होता. भारतीय कंपनी BlueSemi ने या शो मध्ये आपले पहिले प्रोडक्ट EYVA ला लाँच केले आहे. EYVA एक नॉन-इनव्हेसिव्ह कंझ्यूमर हेल्थ टेक गॅजेट आहे, जे केवळ ६० सेकंदांमध्ये ब्लड प्रेशरपासून ते ईसीजीची माहिती देते. CES 2022 मध्ये काही शानदार लॅपटॉप देखील लाँच झाले आहे. या शो मध्ये ASUS Rog Zephyrus Duo 16, Razer Blade series, Dell XPS 13 Plus, Alienware m17 आणि Lenovo ThinkPad Z series ला लाँच केले आहे. या लॅपटॉप्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

ASUS Rog SE Duo 16

asus-rog-zephyrus-2-16

CES 2022 मध्ये ASUS ने आपला शानदार लॅपटॉप Rog Zephyrus Duo 16 ला लाँच केले आहे. मल्टीटास्किंगसाठी आसुसचा हा लॅपटॉप शानदार आहे. या डिव्हाइसमध्ये दोन स्क्रीन दिल्या आसून, यातील एक टच सपोर्टसह येते. कीबोर्डच्या वरती दिलेली टच स्क्रीन स्ट्रीमरसाठी परफेक्ट आहे. यात बेझललेस डिस्प्ले दिला आहे. ASUS चा लॅपटॉप Ryzen ९ ६९८०HX प्रोसेसरसह लिक्विड मेटल कूलिंग सिस्टमसह येतो. याबाबत कंपनीचा दावा आहे की, हे टेम्प्रेचर १५ डिग्रीपर्यंत कमी करते.

रेझर ब्लेड मालिका

रेझर-ब्लेड-मालिका

सीईएस २०२२ मध्ये Razer Blade लॅपटॉप सीरिज देखील लाँच झाली आहे. Razer Blade series ला AMD Ryzen ६००० प्रोसेसरसह सादर करण्यात आले आहे. या प्रोसेसरबाबत दावा करण्यात आला आहे की, हे कोणत्याही हेव्ही गेमला हँडल करू शकते. तसेच, यामुळे बॅटरी देखील लवकर समाप्त होत नाही. या सीरिज अंतर्गत Blade 15 आणि 17 या दोन लॅपटॉपला सादर केले आहे. तीन मॉडेलसह यात १६ जीबी DDR५ रॅम मिळते. याचा रिफ्रेश रेट १४४ हर्ट्ज आहे.

Dell XPS 13 Plus

dell-xps-13-plus

Dell ने देखील कंझ्यूमर इलेक्ट्रॉनिक शो मध्ये आपला प्रीमियम लॅपटॉप लाँच केला असून, कंपनीने Dell XPS 13 ला सादर केले आहे. यात एड्ज टू एड्ज डिस्प्ले, टच सपोर्टसह फंक्शन की दिल्या आहेत. यात ट्रॅकपॅड नाही. Dell XPS 13 Plus मध्ये १३.४ इंच डिस्प्ले दिला आहे. डिस्प्लेचा ब्राइटनेस ४०० निट्स आहे. हा लॅपटॉप Intel Alder Lake P-Series Core i७-१२८०P प्रोसेसरसह येतो. डिव्हाइस विंडोज ११ वर काम करते.

एलियनवेअर m17

alienware-m17

Alienware m17 मध्ये १७ इंच डिस्प्ले दिला असून, ज्या लोकांना गेमिंगची आवड आहे त्यांच्यासाठी खास या लॅपटॉपला लाँच केले आहे. यामध्ये AMD Ryzen ६००० प्रोसेसर मिळेल. लॅपटॉपला Windows १ Home अथवा Windows ११ Pro सह खरेदी करू शकता. कंपनीने या सीरिज अंतर्गत एकूण ५ लॅपटॉप लाँच केले आहेत.

Lenovo ThinkPad Z मालिका

Lenovo ThinkPad Z सीरिज हलकी, स्लिम आणि इको फ्रेंडली आहे. यात रिसायकल अ‍ॅल्यूमिनियमचा वापर केला आहे. सीरिज अंतर्गत Lenovo ThinkPad Z13 आणि ThinkPad Z16 या दोन लॅपटॉपला लाँच केले आहे. दोन्हीमध्ये AMD Ryzen PRO ६००० प्रोसेसर मिळतो. ThinkPad Z13 मध्ये १३.३ इंच, तर ThinkPad Z16 मध्ये १६ इंच ओलेड डिस्प्ले मिळतो. दोन्ही लॅपटॉप डॉल्बी व्हिजनसह येतात.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here