Lenovo Chromebook 14e

Lenovo Chromebook 14e लॅपटॉप मिलिट्री ग्रेड सर्टिफिकेशनसह येतो. यामध्ये १४ इंच FHD डिस्प्ले दिला आहे. लॅपटॉप ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटर्नल स्टोरेजसह येतो. डिव्हाइसमध्ये जी-सूट इंटिग्रेशन देखील मिळते . तसेच, एकदा चार्ज केल्यावर लॅपटॉप १० तासांचा बॅटरी बॅकअप देतो. याचा कीबोर्ड वॉटर-रेसिस्टेंट आहे. म्हणजे, पाणी पडल्यावर देखील लॅपटॉपचा कीबोर्ड खराब होणार नाही. Lenovo Chromebook 14e लॅपटॉपला तुम्ही फक्त २४,९९० रुपयात खरेदी करू शकता.
Asus Chromebook फ्लिप

Asus Chromebook Flip हा कमी किंमतीत दमदार फीचर्ससह येणारा लॅपटॉप आहे. यामध्ये फ्लिप ३६०-डिग्री कन्वहर्टिबल टच-स्क्रीन डिस्प्ले दिला आहे. लॅपटॉप मिलिट्री-ग्रेड ड्यूरेबिलिटी सर्टिफिकेशनसह येतो. यामध्ये इंटेल सेलेरॉन प्रोसेसर दिला आहे. सोबतच, ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज मिळते. डिव्हाइस क्रोम ओएसवर काम करतो. सिंगल चार्जमध्ये यात १० तासांचा बॅटरी बॅकअप मिळतो. डिव्हाइसला तुम्ही फक्त २४,९९९ रुपयात खरेदी करू शकता.
HP Chromebook MediaTek MT8183

HP Chromebook MediaTek MT8183 लॅपटॉपची किंमत २५ हजार रुपयांपेक्षा कमी आहे. हा लॅपटॉप मीडियाटेक प्रोसेसर सपोर्टसह येतो. यात ११.६ इंच डिस्प्ले दिला आहे. याशिवाय ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज मिळते. एकदा चार्ज केल्यावर लॅपटॉप १२ तास वापरू शकता. क्रोम ओएसवर काम करणारा हा लॅपटॉप गुगल असिस्टेंट सपोर्टसह येतो. HP Chromebook MediaTek MT8183 ला तुम्ही फक्त २३,४९० रुपयात खरेदी करू शकता.
Asus Chromebook C223

Asus Chromebook C223 हा एक हलका लॅपटॉप असून, यात ११.६ इंच डिस्प्ले दिला आहे. क्रोम ओएसवर काम करणाऱ्या या लॅपटॉपमध्ये ४ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटर्नल स्टोरेज मिळते. इंटेल ड्यूअल-कोर Celeron N३३५० प्रोसेसरसह येणाऱ्या या लॅपटॉपची किंमत २३,९६६ रुपये आहे.
Acer Chromebook 311 C733-C5A
या लॅपटॉपमध्ये ४ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटर्नल स्टोरेज दिले आहे. यात ११.६ इंच डिस्प्ले, इंटेल यूएचडी ग्राफिक्स ६००, १२.५ तासांची बॅटरी लाइफ मिळते. Acer Chromebook 311 C733-C5A ची किंमत २३,९९० रुपये आहे.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times