Samsung Galaxy M12

Samsung Galaxy M12 स्मार्टफोन ४ जीबी रॅम + ६४ जीबी स्टोरेज आणि ६ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज अशा दोन व्हेरिएंटमध्ये येतो. या फोनची सुरुवाती किंमत फक्त ११,४९९ रुपये आहे. या फोनला तुम्ही Amazon वरून खरेदी करू शकता. फोनवर मिळणाऱ्या ऑफर्सविषयी सांगायचे तर HSBC आणि Standard Charted बँकेच्या कार्डचा वापर करून खरेदी केल्यास २ हजार रुपयांपर्यंत इंस्टंट डिस्काउंट मिळेल. फोनमध्ये ६००० एमएएचची बॅटरी दिली आहे. तसेच, रियरला ४८ मेगापिक्सल + ५ मेगापिक्सल + २ मेगापिक्सल + २ मेगापिक्सल क्वाड कॅमेरा सेटअप मिळतो.
Realme Narzo 50A

Realme Narzo 50A स्मार्टफोन देखील ४ जीबी रॅम + ६४ जीबी स्टोरेज आणि ४ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येतो. या फोनची सुरुवाती किंमत ११,४९९ रुपये आहे. फोनला फ्लिपकार्टवरून आकर्षक ऑफर्ससह खरेदी करू शकता. डिव्हाइसला Axis बँकेचे कार्ड वापरून खरेदी केल्यास ५ टक्के इंस्टंट डिस्काउंट मिळेल. तसेच, ३९९ रुपये सुरुवाती ईएमआय आणि १०,९९९ रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळेल. यात ६००० एमएएचची बॅटरी, ५०MP+२MP+२MP चा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो.
रेडमी 10 प्राइम

Redmi 10 Prime स्मार्टफोन ४ जीबी रॅम + ६४ जीबी स्टोरेज आणि ६ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येतो. फोनची सुरुवाती किंमत १२,९९९ रुपये आहे. फोन Amazon वर स्वस्तात उपलब्ध आहे. फोनला HSBC आणि Standard Charted बँक कार्ड वापरून खरेदी केल्यास २ हजार रुपयांपर्यंत इंस्टंट डिस्काउंट मिळेल. फोनमध्ये ६००० एमएएचची बॅटरी आणि ५० मेगापिक्सल + ८ मेगापिक्सल + २ मेगापिक्सल + २ मेगापिक्सल क्वाड रियर कॅमेरा सेटअप मिळतो.
Redmi 9 पॉवर

Redmi 9 Power स्मार्टफोन ४ जीबी रॅम + ६४ जीबी, ४ जीबी रॅम + १२८ जीबी आणि ६ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येतो. फोनची सुरुवाती किंमत १३,७९५ रुपये आहे. फोनला फ्लिपकार्टवरून खरेदी करताना Axis बँकेच्या कार्डचा वापर केल्यास ५ टक्के इंस्टंट डिस्काउंट मिळेल. फोनला ४७९ रुपयांच्या सुरुवाती ईएमआयवर देखील खरेदी करू शकता. फोनमध्ये ६००० एमएएच बॅटरी, ४८ मेगापिक्सल + ८ मेगापिक्सल + २ मेगापिक्सल + २ मेगापिक्सलचा क्वाड रियर कॅमेरा सेटअप मिळेल.
Samsung Galaxy M31

Samsung Galaxy M31 स्मार्टफोन ८ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज या एका व्हेरिएंटमध्ये येतो. फोनची सुरुवाती किंमत १९,९९९ रुपये आहे. सॅमसंगचा हा फोन Amazon वर आकर्षक ऑफर्ससह उपलब्ध आहे. फोनला HSBC आणि Standard Charted बँकेचे कार्ड वापरून खरेदी केल्यास २ हजार रुपयांपर्यंत इंस्टंट डिस्काउंट मिळते. फोनमध्ये ६००० एमएएचची बॅटरी आणि ६४ मेगापिक्सल + ८ मेगापिक्सल + ५ मेगापिक्सल + ५ मेगापिक्सलचा क्वाड रियर कॅमेरा सेटअप मिळतो.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times